Bathroom cleaning tips: बाथरूमची सफाई हा घरातील सर्वात महत्त्वाचा पण सर्वात दुर्लक्षित भाग असतो. दररोज पाणी, साबण, हार्ड वॉटर (खनिजयुक्त पाणी)आणि आर्द्रतेमुळे टाइल्सवर चिकट थर तयार होते. काही दिवस नियमित साफसफाई झाली नाही तर हा अधिक चिकट होतो आणि दिसायलाही ते अत्यंत विद्रुप किंवा अस्वच्छ दिसते, त्यामुळे बाथरूमचा संपूर्ण लूक खराब होतो; पण चांगली गोष्ट म्हणजे हेच हट्टी डाग तुम्ही घरातल्या अगदी सोप्या वस्तूंनी स्वच्छ करू शकता! कोणतेही महागडे केमिकल न वापरता टाइल्स पुन्हा चमकदार दिसू शकतात.

बाथरूमच्या टाइल्सवर घाण का जमते?

काळानुसार बाथरूमच्या टाइल्सवर साबणाचा थर, हार्ड वॉटरचे पिवळे/पांढरे डाग, ओलसरपणामुळे निर्माण झालेली बुरशीसुरुवातीला ही घाण सहज निघते, पण कालांतराने ती डाग हट्टी होते. विशेषतः जमिनीच्या आणि भिंतीच्या कोपऱ्यांमध्ये काळे कडे तयार होतात, त्यामुळे टाइल्सची चमक कमी होते. आणि त्यांचा रंगही फिका पडतो.

१. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

बाथरूम स्वच्छतेसाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे एक उत्तम मिश्रण आहे.

ते कसे करावे?

एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा घ्या. त्यात काही थेंब पांढरे व्हिनेगर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट टाइल्सवर लावा, विशेषतः पिवळ्या आणि काळ्या डागांवर. १५ मिनिटे तशीच राहू द्या. नंतर ब्रशने घासून धुवून टाका. यामुळे टाइल्सवरील टाइल्सवरील जाड हट्टी थर सहज साफ होतात आणि टाइल्स पुन्हा चमकदार दिसतात.

२. हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बेकिंग सोडा

जर टाइल्सवर बुरशीमुळे काळे ठिपके आले असतील किंवा खूप जुनी, काळी बुरशी जमा झाली असेल असेल तर हा उपाय एकदम योग्य आहे.

कसे वापरायचे?

बेकिंग सोडामध्ये काही थेंब हायड्रोजन पेरॉक्साइड टाका. त्यानंतर पेस्टसारखे मिश्रण तयार करा. हे मिश्रण टाइल्सवर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. मग ब्रश किंवा स्क्रबरने घासून धुवा. यामुळे बुरशी, काळे-पिवळे डाग आणि हट्टी मळ सेकंदात सुटतात.

३. लिंबू आणि मीठ

लिंबामध्ये असणारे नैसर्गिक सिट्रिक असिड घाण, बुरशी आणि दुर्गंधी सहज दूर करते.

कसा करायचा उपाय?

टाइल्सवर थेट लिंबाचा रस पिळा आणि त्यावर थोडे मीठ शिंपडा. ब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे हट्टी डाग निघतात आणि टाइल्स नैसर्गिक चमकदार होतात.

टाइल्स स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स

१. आठवड्यातून किमान दोनदा बाथरूमच्या टाइल्स साफ करा.

२. प्रत्येकदा अंघोळीनंतर टाइल्सवरचा अतिरिक्त पाण्याचा थर पुसून काढा.

३. हार्ड वॉटर असेल तर नियमितपणे व्हिनेगर स्प्रे करून साफ करा.

४. बाथरूममध्ये पुरेशी हवा खेळती ठेवा, त्यामुळे बुरशी वाढत नाही.