How To Take Care Of Shoes In Monsoon: बहुतांश राज्यांत मान्सून दाखल झाला आहे. त्याचबरोबर शाळा-कॉलेजच्या सुट्याही संपल्या आहेत. अशा परिस्थितीत, कामावर जाताना किंवा शाळेत जाताना शूज ओले होण्याचे टेन्शन असेल तर काही टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. शूज जर ओले झाले तर ते खराब होतात, त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि पायात बुरशी इत्यादींमुळे खाज सुटणे किंवा त्वचेचे आजारही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, त्यांना कोरडे आणि स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात तुम्ही तुमचे शूज किंवा चप्पल कोरडे आणि स्वच्छ कशी ठेवू शकता.

भिजलेले शूज -चप्पल बाजूला ठेवा पहिली गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही ओले झाल्यावर घरी याल तेव्हा सर्वप्रथम बुटाचे लेसेस काढून हवेशीर जागी ठेवावे जेणेकरून पाणी बाहेर पडून ते कोरडे होतील. त्यांना सुकविण्यासाठी उन्हात ठेवा किंवा टेबल फॅन वापरा. लक्षात ठेवा की जोपर्यंत तुमचे शूज पूर्णपणे कोरडे होत नाहीत तोपर्यंत ते शू रॅकमध्ये ठेवू नका. असे केल्याने त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी लगेच होऊ शकतात.

हेही वाचा – बापरे! डोळ्यादेखत एटीमएम मशीनमध्ये शिरला भल्ला मोठा साप! Viral Video पाहून अंगावर येईल काटा

वर्तमानपत्राने सुकवा – जर शूज घाण झाले असतील तर ते चांगले धुवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका. वर्तमानपत्र घ्या आणि त्याचे गोळे तयार करा आणि शूजमध्ये व्यवस्थित भरा. आता वर्तमानपत्र बाहेरूनही व्यवस्थित गुंडाळा आणि रात्रभर वाऱ्याखाली ठेवा. सकाळपर्यंत ते कोरडे होईल.

वॉशिंग मशीन वापरा – तुम्ही खराब उशीचे कव्हर घ्या आणि त्यात धुतलेले शूज ठेवा आणि बांधा. आता ते मशीनमध्ये ठेवा आणि सोबत काही कोरडे कपडे घाला. आता मशीन २० मिनिटांसाठी ड्रायर मोडवर चालवा. शूज पूर्णपणे कोरडे होईल.

हेही वाचा – Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ ५ टिप्स करा फॉलो

वॅक्स पॉलिश किंवा व्हॅसलीनने बनवा वॉटर प्रूफ – ऑफिस किंवा शाळेत जाण्यासाठी लेदर बूट वापरत असाल तर पावसाळ्यातच वॅक्स पॉलिश वापरा. वॅक्स तुमचे शूज वॉटरप्रूफ बनवेल आणि ओले झाले तरी ते ओले होण्यापासून संरक्षण करेल. जर तुमच्याकडे वॅक्स पॉलिश नसेल तर तुम्ही व्हॅसलीन देखील वापरू शकता.

केळीच्या सालीने चमकवा बूट – जर पावसामुळे तुमच्या लेदरच्या बुटांची चमक नाहीशी झाली असेल, तर एक केळी घेऊन त्याची साल काढून बूट आतून चांगले घासून घ्या. यानंतर, रुमालाच्या मदतीने ते पुसून घ्या. बूट चमकदार होतील.