How to Get Rid of Red Ants : तुमच्या घरी लाल मुंग्या दिसतात का? किंवा एखादा गोड पदार्थाचा छोटा कण जरी पडला तरी लाल मुंग्या होतात का? तर टेन्शन घेऊ नका. ही बातमी तुमच्यासाठी आहे. लाल मुंग्या घालवण्यासाठी आज आपण सोपा असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर लाल मुंग्याचा त्रास कसा दूर करायचा, याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लाल मुंग्या घरातून पळवण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हिडीओतील सोपा उपाय पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. (How to Keep Red Ants Away at home in just 15 minutes)

लाल मुंग्या घरातून अशा पळवा

व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
व्हिडीओत तुम्हाला लाल मुंग्या दिसतील. त्यावर उपाय म्हणून नियमित सर्वात जास्त खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गव्हाच्या पीठाचा उपयोग करायचा आहे. जिथे मुंग्या आहेत, त्याठिकाणी गव्हाचे सुखे पीठ टाका.१५ ते २० मिनिटांनी बघा, घरातील सर्व मुंग्या गायब होणार. हा भन्नाट हॅक तुम्हीही वापरून पाहा. काही लोकांना कदाचित ही ट्रिक माहिती असेल तर काही लोकांनी ही ट्रिक पहिल्यांदा जाणून घेतली. खरंच ही ट्रिक उपयोगाची आहे का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक एकदा घरी वापरून पाहावी लागेल.

हेही वाचा : राहुल गांधींकडून ५० वर्षांसाठी पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा? विरोधकांकडून टीका; जाणून घ्या काय आहे सत्य

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

prajakta_salve_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लाल मुंग्या घालवण्यासाठी फक्त पीठ वापरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमच्या घरी पिठातच मुंग्या होतात.” तर एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय,”आमच्या घरच्या मुंग्या निर्लज्ज आहे . पीठ टाकलं ते पीठ सुद्धा घेऊन जाणार” आणखी एका युजरने विचारलेय, “माशा जाण्यासाठी पण उपाय सांगा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय लाल मुंग्या पळवण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. तसेच लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्यावर लिंबाचा रस स्प्रे करा. मुंग्या पळून जातील.