Home remedy for bad smell: उन्हाळ्यामध्ये सतत घामाच्या धारा लागलेल्या असतात ज्यामुळे चिकटपणा जाणवत असतो. कपडे देखील घामामुळे अंगाला चिकटतात. दिवसभर शरीराला येणारा घाम कपड्यांमध्ये शोषला जातो ज्यामुळे त्यांना दुर्गंधी येते. अनेकदा धुतल्यानंतरही घामाचा वास जात नाही. त्यामुळे तुम्हाला असे कपडे वापरणे शक्य होत नाही. चारचौघांमध्ये वावरताना संकोच वाटतो. अशा स्थितीमध्ये कपड्यांना येणारा घामाचा वास घालवण्यासाठी काही जबदस्त टिप्स येथे सांगणार आहोत ज्या वापरून पाहू शकता.

कपड्यांना येणारा घामाचा वास कसा घालवावा? | How to remove the smell of sweat from clothes

लिंबू

लिंबू कपड्यांना येणारा दुर्गंध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुम्हाला फक्त एका बादलीमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्या एक-दोन लिंबू पिळून त्यात कपडे बुडवून पिळून घ्या. लिंबाचा सुंगध कपड्यांना येणारी दुर्गंधी गायब करण्यास मदत करू शकतो.

padsaad Mind-blowing struggle
पडसाद : मन हेलावणारा संघर्ष
diy weight loss hacks how much weight loss per week is safe and healthy options for weight loss as per icmr
दर आठवड्याला किती वजन कमी करणे सुरक्षित? ICMR ने सांगितल्या वजन कमी करण्यासाठीच्या ट्रिक्स
Things to Know about Mouthwash
तोंडातील दुर्गंधीपासूनच्या सुटकेसाठी तुम्हीही रोज माउथवॉश वापरताय? पण डाॅक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
benefits of salt water
उन्हाळ्यात दररोज मिठाचं पाणी प्यायल्यानं काय होतं? ६ आश्चर्यकारक फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा
use toothpick to keep prui puffed
टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी ‘टूथपिक’चा करा असा वापर! भन्नाट टिप्ससह खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी पाहा…
Moong dal samosa recipe
घरात सर्वांना नक्की आवडतील मूग डाळीचे हेल्दी समोसे; नोट करा ‘ही’ हटके रेसिपी
sodyachi khichdi recipe in marathi
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी खास “सोड्याची खिचडी” झटपट होईल तयार
Make Tasty Mango Jam at home
तुमच्या मुलांसाठी घरीच बनवा ‘आंब्याचा टेस्टी जाम’; पटकन नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी

हेही वाचा – उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी

बेकिंग

बेकिंग सोडा स्वयंपाकामध्ये खूप उपयूक्त ठरतो पण त्याचबरोबर कपड्यांची स्वच्छता करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. तुम्हाला फक्त कपडे धुताना बेकिंग पावडरमध्ये मिसळायचे आहे. असे केल्यास तुमच्या कपड्यांना लागलेली बुरशी आणि दुर्गंधी गायब होईल.

कपडे उलटे करून उन्हात वाळवा

कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी नेहमी कपडे उलटे करून धुवायला टाका. वारंवारं कपडे धुतल्या ते लवकर खराब होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये घामाचा दुर्गंध दूर करण्यासाठी कपडे उलटे करून उन्हात वाळवा. असे केल्याने कपड्यांना येणारा वास खूप सहज निघून जाईल.

हेही वाचा – अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग

कपडे खूप वेळ भिजवून ठेवू नका

अनेकांना कपडे धुण्याआधी काही वेळ भिजत घालण्याची सवय असते. सहजा कपडे धुण्याआधी १-२ भिजत घातले जातात. पण कपडे धुणाऱ्या मावशी आल्या नाही किंवा कपडे धुण्याची मशीन बंद पडली तर अनेकदा आधीच भिजत घातलेले कपडे एक-दोन दिवस तसेच पडून राहतात. असे करू नका
कपड्यांना जास्त वेळ भिजत ठेवू नका. बराच वेळ कपडे अस्वच्छ कपडे गोळा करून ठेवू नका. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची समस्येतून सुटका होऊ शकते.