प्रत्येक घरात अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे वीज बिल जास्त प्रमाणात येत असते. परिणामी वीजबिलात वाढ झाल्याने प्रचंड त्रास होत आहे. आता उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात अनेकदा आपण फ्रीजमधून वस्तू आणि पाणी बाहेर काढण्यासाठी दार उघडतो. त्यामुळे वीज बिलावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. घरांमधील छोटे किचन हॅक्स तुम्हाला विजेचं बील कमी येण्यासाठी नक्कीच मदत करतील. फ्रिज हा सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणारं उपकरण आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका गृहिनीने असं काही हॅक्स सांगितले आहेत. जे तुम्हाला विज बिल कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील.

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान असाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी फ्रिजचा विज बिल कमी येण्यासाठी कागदाचा वापर केला आहे का? नाही ना.. मग एकदा करुन बघा. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

wheat flour get moldy if it is stored for a long
गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Stretch marks home remedies and clinical treatments to lighten them effective method
Stretch Marks घालवण्यासाठी करताय प्रयत्न? ‘या’ घरगुती आणि क्लिनिकल पद्धती एकदा वापरून पाहा, लगेच जाणवेल फरक
jhansi pitbull king cobra viral video
Video: पिट बुल श्वानाची कमाल; लहान मुलांना वाचविण्यासाठी नागाला आपटून आपटून मारलं, व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
YouTube new pause ads feature Do not pause videos
गाणं ऐकताना सतत ॲड्स येतात? YouTube ने शोधला उपाय; आता pause न करता व्हिडीओ बघा
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
The lion came with the speed of the wind and attacked the cheetah
जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा
pager blasts in Lebanon marathi news
विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?

(हे ही वाचा :Jugaad Video: मीठ खरेदी केल्यानंतर एकदा स्वयंपाकघरातील लाटण्यावर टाकून पाहा; काय कमाल झाली एकदा पाहाच! )

नेमकं काय करायचं? 

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने सांगितल्यानुसार, अनेकदा फ्रिजचा दरवाजा उघडल्याने काही दिवसानंतर तो दरवाजा नीट बंद होत नाही, ज्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर येते आणि आपलं फ्रीज थंड होत नाही. त्यामुळे तेथील वस्तू खराब होतात. यामुळेच विज बिलही जास्त येतो. आपल्या फ्रीजचा दरवाजा नीट लागत आहे की नाही, हे पाहण्यासाठी टिश्शू पेपर किंवा साध्या कागदाचा वापर करुन तपासून पाहा. पेपर न फाटता सहज बाहेर येत असेल तर नक्कीच आपल्या फ्रीजमध्ये बिघाड झाला. हे लक्षात घ्या…असे महिलेने सांगितले. दरवाज्यामध्ये असलेल्या रबरमुळे ही समस्या निर्माण होते. महिलेने सांगितल्यानुसार, फ्रीजमधील रबरमध्ये घाण साचल्याने समस्या निर्माण होते. यासाठी रबर स्वच्छ करणे गरजेचे आहे. काॅटनच्या साहाय्याने रबर नीट पुसून घ्या, असे महिलेने सांगितले आहे. यामुळे टाकेलेलं कागद बाहेर येणार नाही, त्यामुळे आपलं विज बिल नक्की कमी येईल, असा महिलेने दावा केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Puneri tadka या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)