Hair Care:जसजसे वय वाढते तसतसे केस नैसर्गिकरित्या पांढरे दिसू लागतात. पण, आजकाल अनेकांच्या केसांमध्ये कमी वयातही पांढरे केस दिसू लागले आहेत. केस पांढरे झाल्यावर दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी रंग लावावा लागतो. डाय करणे त्रासदायक असतेच परंतु पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही. तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही डोक्यावर खोबरेल तेल आणि मेथीदाणे वापरू शकता. खोबरेल तेलात फक्त एकच नाही तर असे अनेक गुणधर्म आहेत जे केसांना पांढरे होण्यापासून दूर ठेवतात .तसेच केसांची चमक, सौंदर्य आणि जाडपणा देखील टिकवून ठेवतात. केसांवर खोबरेल तेल कसे लावले जाते ज्यामुळे पांढरे केस काळे होऊ शकतात.

खोबरेल तेल आणि मेथीचे दाणे | Coconut Oil And Fenugreek Seeds For White Hair

खोबरेल तेलापासून केसांना पोषण मिळते. खोबरेल तेल केसांची आर्द्रता राखते. या तेलातील फॅटी ॲसिड केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांना नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. त्याचबरोबर खोबरेल तेल केसांना झालेले नुकसानही दुरुस्त करते. मेथी दाणे खोबरेल तेलात मिसळून लावल्यास केसांचा पांढरेपणा दूर होतो. मेथीच्या दाण्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही आढळतात. याशिवाय मेथी आणि खोबरेल तेल केसांना मुळापासून शेवटपर्यंत पोषण देते.

man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
no drinking water supply in Panvel city along with New Panvel and Kalamboli for two days
पनवेल : पाणी बचतीपूर्वी पिण्यासाठी नळातून पाणी तरी सोडा

हेही वाचा – मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी

पांढरे केस काळे करण्यासाठी एक चमचा मेथीच्या बियांची पावडर घेऊन त्यात ४ ते ५ चमचे खोबरेल तेल मिसळा. आता हे तेल उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. तेल शिजल्यावर ते विस्तवावरून काढून थंड होण्यासाठी ठेवा. हे तेल आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते. या तेलाने डोक्याला मसाज केल्यास केस काळे होताना दिसतील.

या उपायांचाही परिणाम दिसून येईल

केस काळे होण्यासाठी कढीपत्ता खोबरेल तेलात मिसळून डोक्याला लावू शकता. तुम्हाला फक्त एक मूठभर कढीपत्ता खोबरेल तेलात मिसळावे लागेल आणि नंतर ते केसांना लावावे आणि किमान १ तास ठेवावे. यानंतर आपले डोके धुवून स्वच्छ करा. हवे असल्यास हे तेल रात्रभर डोक्याला लावून ठेवू शकता.

हेही वाचा – Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी

लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांना लावल्यानेही पांढरे केस काळे होऊ शकतात. लिंबातील अँटी-ऑक्सिडंट्स आपला प्रभाव दाखवतात. ३ चमचे खोबरेल तेलात ३ चमचे लिंबाचा रस मिसळून डोक्याला लावा. ४५ ते ५५ मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.