scorecardresearch

जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतंय?

‘या’ काही खास टिप्स नक्की वाचा

desserts habit of eating after meal
प्रातिनिधिक छायाचित्र

‘माझं वजन खूप वाढलंय, काय करावं कळतच नाही.’ ‘मी तर रोज व्यायाम पण करते, रात्रीचं जेवणही खूप कमी केलंय तरीही काहीच फरक नाही.’ असे संवाद आपल्या कानावर सर्रास पडतात. मग डाएटचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. यात केवळ लिक्वीड डाएट घेणे, सॅलाड आणि कडधान्ये खाणे, कोणतेतरी शेक पिणे असे उपाय केले जातात. मात्र दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलल्या तरीही त्याचा बराच फायदा होऊ शकतो. अनेकांना जेवण किंवा नाश्ता झाला की काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायचीही सवय असते. मात्र वजन कमी करायचे असल्यास गोड खाण्यावर नियंत्रण आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्वचित कधीतरी आणि तेही ठराविक प्रमाणात गोड खाणे ठिक. यातही कोणते गोड पदार्थ आणि किती खावेत याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

बाहेर जेवल्यानंतर अनेकदा आयस्क्रीम खाल्ले जाते किंवा अनेक जण कॉफीही घेतात. डोनटस, कुकीज किंवा अगदी काहीच नसेल तर मग साखरही खाल्ली जाते. आता वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ पूर्ण बंद करायचे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण हे तुमच्या आवडीचे पदार्थ खाणे पूर्ण बंद करायचे नाहीत तर रोज खात असू तर ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खायचे. याशिवायही काही उपयुक्त टिप्स…

१. हर्बल टी हा गोड पदार्थांना चांगला पर्याय ठरु शकतो. त्यामुळे जेवणानंतर गोडाऐवजी हर्बल टी घेतल्यास फायद्याचे ठरते.

२. जेवणानंतर गोड खावेसे वाटल्यास एखादा हेल्दी पर्याय मिळतोय का ते पाहा. जेवणात किंवा त्यानंतर एखादे फळ खाऊ शकता. सफरचंद, पेरु, संत्रे अशी फळे खाल्लेली चांगली.

३. शक्यतो रात्री झोपताना गोड खाण्यापेक्षा दिवसा किंवा सकाळी खाल्लेले जास्त चांगले.

४. केक, डोनट, नानकटाई असे बेकरी प्रॉडक्टस आठवड्यातून शक्यतो एकदाच खावेत.

५. गोड पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असल्याने त्याने पटकन वजन वाढते. त्यामुळे एखादवेळी थोडेसे जास्त जेवण झाले तरी ठिक पण गोड पदार्थ दररोज खाणे टाळलेलेच बरे.

६. आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणेही अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे शरीरात अन्नामुळे तयार होणाऱ्या कॅलरीज जाळण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2017 at 12:38 IST
ताज्या बातम्या