Jalebi Benefits: जिलेबी हा भारतातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे, जो कोणत्याही शुभ कार्यात आवर्जून बनवला जातो. परंतु, हल्ली डाएटमुळे अनेक लोक जिलेबी खाणं टाळतात. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? जर जिलेबीचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर जिलेबीचे आरोग्यासाठी फायदे आहेत, जसे की मायग्रेनपासून ते नैराश्यापर्यंत आणि प्रजनन क्षमता वाढवण्यापर्यंत अशा पाच आजारांचा धोका जिलेबीमुळे कमी होऊ शकतो.

जिलेबीमुळे कमी होईल ‘या’ आजारांचा धोका

मायग्रेनचा त्रास

जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात औषधे घेत असाल तर जिलेबी खाण्याचा प्रयत्न करा. मायग्रेनवर हा रामबाण उपाय आहे. जिलेबी खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. जेव्हा तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो, तेव्हा फक्त एक जिलेबीदेखील ती लक्षणीयरीत्या कमी करू शकते.

नैराश्य आणि तणाव कमी करण्यासाठी

जिलेबी ही तणाव कमी करणारा पदार्थ मानली जाते. जेव्हा तुम्हाला ताण किंवा चिंता वाटत असेल तेव्हा जिलेबी खाल्ल्याने तुमचा मूड चांगला होईल आणि चिंता आणि ताण कमी होईल.

वजन वाढण्यास मदत

वजन कमी असणाऱ्या लोकांचे अनेक चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतरही वजन वाढत नाही, त्यांनी त्यांच्या आहारात दुधाची जिलेबी समाविष्ट करावी. दुधाची जिलेबी खाल्ल्याने वजन लवकर वाढण्यास मदत होते. तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास दुधासोबत तुपात तळलेली जिलेबी खाऊ शकता.

दमा, सर्दीसाठी फायदेशीर

गरम दुधाबरोबर जिलेबी खाल्ल्याने दमा, सर्दी आणि खोकलादेखील बरा होऊ शकतो, यामुळे तुम्हाला एकाग्रता निर्माण होण्यासदेखील मदत होते.