Immunity Boosting Vegetables : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी शरीर उबदार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला थंडी वाजू नये, ऊब मिळावी यासाठी आपण स्वेटर, कानटोपी, स्कार्फ वापरतो. त्वचेवर विविध क्रिम, लोशन्स लावतो. या दिवसांत शरीराच्या बाह्य अंगासह शरीराला आतूनही पोषक वातावरण मिळणे गरजेचे असते, त्यामुळे थंडीत अशा काही भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात.

थंडीत ‘या’ भाज्यांचे सेवन अत्यंत फायदेशीर

रताळे

रताळे हे सर्वात फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. त्यातील कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला उबदार ठेवण्यास आणि ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. तुम्ही रताळे उकडून, भाजून खाऊ शकतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबरदेखील भरपूर असतात.

गाजर

गाजर ही एक अशी भाजी आहे, जी हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. त्यातील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि निरोगी त्वचा वाढवतात. तुम्ही ते सूप, सॅलेड स्वरूपात खाऊ शकता.

मुळा

मुळ्यामध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. मुळा कच्चा, सूपमध्ये किंवा त्याचे पराठे बनवून तुम्ही खाऊ शकता. मुळा पचनास फायदेशीर असून हिवाळ्यातील खोकला आणि सर्दी टाळण्यास मदत करते.

भेंडी

भेंडीमध्ये फायबर आणि लोह असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि शरीराला उबदार ठेवते. हिवाळ्याच्या काळात भेंडीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

भोपळा

भोपळा हिवाळ्यासाठी हलका आणि पचण्यास सोपी भाजी आहे, परंतु ती शरीराला उबदार करण्यास आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासदेखील मदत करते. भोपळा सूप, भाजीच्या स्वरूपात खाऊ शकतो. ते पोट स्वच्छ करण्यास आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करते.

पालक

पालकामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते आणि शरीर उबदार ठेवते. हिवाळ्याच्या काळात पालकाचे सूप, पकोडे किंवा पराठे स्वरूपात सेवन करणे फायदेशीर ठरते.

शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅप्सेसिन असते, जे शरीरात उष्णता निर्माण करते. ते हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि सर्दी रोखण्यास मदत करते. ते सॅलेड, भाज्या किंवा सूपमध्ये खाऊ शकता.

कोबी

कोबीत भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते, जे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. ते सूप, करी किंवा स्ट्राई-फ्रायमध्ये खाऊ शकता. ते पचनास मदत करते आणि शरीरात उष्णता निर्माण करते.