जिओने आपल्या युजर्सना एक धमाकेदार ऑफर दिली आहे. रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी कॅशबॅक ऑफरची तारीख वाढवली आहे. रिलायन्स जिओच्या कॅशबॅक ऑफरमध्ये ३९८ किंवा त्याहून जास्त रिचार्जवर ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर फक्त ऑनलाइन रिचार्जवर दिली जात आहे. याचा अर्थ तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाऊन रिचार्ज केलात तर ही ऑफर मिळणार नाही. ही ऑफर ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. युजरने जिओ अॅपमधून ३९८ चा किंवा त्याहून जास्तचा रिचार्ज केला, तर त्याच्या वॉलेटमध्ये ३०० रुपये जमा होतील. याशिवाय जिओ अॅपमध्ये ५०-५० रुपयांचे आठ वाऊचर्स मिळतील. या वाऊचर्सचा वापर तुम्ही ३०९ चा किंवा त्याहून जास्तचा रिचार्ज करण्यासाठी करु शकता. एका रिचार्जवर एकाच वाऊचरचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय अॅमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि पेटीएमसारख्या वॉलेटमधून रिचार्ज केल्यावरही ऑफर मिळत आहे.

कोण किती कॅशबॅक देतंय –
रिलायन्स जिओचा रिचार्ज अॅमेझॉन पे वरुन केल्यास नव्या आणि जुन्या युजर्सना ५० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. मोबिक्विकवरुन जिओच्या नव्या आणि जुन्या युजर्सनी रिचार्ज करताना JIOFULL कोड टाकला, तर ३०० रुपयांचास कॅशबॅक मिळेल. पेटीएमवरुन जिओचा ३९८ किंवा त्याहून जास्तचा रिचार्ज करताना नवीन युजरने NEWJIO कोड वापरल्यास ८० रुपयांचा कॅशबॅक मिळणार. याशिवाय जुन्या युजर्सनी PAYTMJIO कोड वापरला तर त्यांना ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

फ्रीचार्जवरुन रिचार्ज करत असताना JIO75 कोड टाकल्यास जिओच्या नव्या युजर्सना ७५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर जुन्या युजर्सनी FCJIO कोड वापरल्यास ३० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. फोनपेवरुन रिचार्ज केल्यास नव्या युजर्सना ९० रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि जुन्या युजर्सना ६० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

काय आहे ३९८ चा प्लान –
जिओच्या ३९८ च्या रिचार्जवर युजरला अनलिमिटेड डाटा दिला जात आहे. मात्र त्यासाठी एक अट आहे. युजरला दिवसाला फक्त २ जीबी हायस्पीड डाटा मिळेल. दिवसाची लिमिट संपल्यास इंटरनेट अनलिमिटेड चालत राहील मात्र स्पीड 64kbps होईल. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधाही दिली जात आहे. सोबतच १०० एसएमएसही दिवसाला मिळतील. हा प्लान फक्त ७० दिवसांसाठी वैध आहे.