Kitchen Jugaad : गूळ खरेदी करायचा असेल तर आपण थेट बाजारात जातो आणि मिळेल त्या भावाने खरेदी करतो. खरं तर गुळाचे खूप फायदे आहेत. गुळामध्ये नैसर्गिक साखर असून गूळ हा अनेक आरोग्याच्या समस्यांसाठी रामबाण उपाय म्हणून काम करते. घशातील खवखव असो किंवा अॅसिडीटी, गॅसेसचा त्रास गूळ आवर्जून खाल्ला जातो. तुम्ही सुद्धा गूळ विकत आणता का? ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कदाचित गूळ घरी बनवू शकाल. हो, आज आपण घरच्या घरी भेसळमुक्त गूळ कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत.
सध्या उन्हाळा सुरू आहे. जिकडे तिकडे उसाचा रस विकणाऱ्या गाड्या दिसत असेल.बाहेरून एक लीटर ऊसाचा रस घेऊन या आणि घरच्या घरी ऊसाच्या रसापासून गूळ तयार करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गूळ कसा तयार करावा? सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरच्या घरी ऊसाच्या रसापासून गूळ कसा तयार करायचा, हे सांगितले आहे.
घरच्या घरी गूळ कसा बनवायचा?
- एक लीटर ऊसाचा रस घ्या.
- त्यानंतर एक मोठी जाडसर अशी लोखंडी आणि स्टीलची कढई घ्या.
- त्यात उसाचा रस टाका आणि कमी मध्यम आचेवर ऊसाचा रस उकळून घ्या
- चांगली उकळी आली की ऊसाच्या रसावर फेस दिसून येईल.तो फेस काढून टाकावा. ऊसाच्या रस लाकडी चमच्याने सातत्याने ढवळून घ्यायचा.
- ३५ ते ४० मिनिटांमध्ये तुमचा गूळ तयार होईल.
- एक सिलिकॉन साशा घ्यायचा आणि त्यात हा गूळ टाकायचा. दोन तासानंतर भेसळमुक्त आणि नैसर्गिक घरच्या घरी गूळ तयार होईल.
या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी गूळ बनवू शकता. त्यासाठी खालील व्हिडीओ नीट पाहा.
हेही वाचा : गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
पाहा व्हिडीओ
prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरच्या घरी बनवा गूळ ते पण एकदम ताजा” “