Kitchen Jugaad Video: झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात असते. घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू हवाच. झाडूशिवाय घरातील साफसफाई पूर्ण होऊच शकत नाही. पण तुम्ही कधी याच घरातील झाडूला कांदा लावून पाहिलं आहे का? झाडूला कांदा लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की पाहूनच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. किचन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी झाडूला कांदा लावून पाहिलं का? नाही ना.. मग एकदा झाडूला कांदा लावून बघा. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. झाडू आणि कांद्याचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Jugaad Video: एक्सपायर औषध गोळ्यांचा स्वयंपाकघरातील ‘या’ कामासाठी वापर करुन पाहा; २ मिनिटांतच चकीत करणारा परिणाम)

नेमकं काय करायचं? 

व्हिडिओत दाखवल्यानुसार, महिलेने गॅसवर पाणी गरम करायलं ठेवलं आहे. मग त्या पाण्यात सालीसकट कांदा कापून महिलेने त्यात टाकलं आहे. मग यानंतर महिलेने व्हिनेगर टाकलं आहे. त्यानंतर महिलेने पाणी थोडं आटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत त्याला ढवळलं आहे. मग हे पाणी थंड करुन महिलेने एका बाटलमध्ये भरलं आहे आणि बाटलीच्या झाकणाला छोटसं छिद्र पाडलं आहे. आता एक झाडू घेऊन महिलेने या झाडूला मोजे घालून दिले आहे. या मोज्यावर महिलेने बाटलीतील तयार केलंल पाण्याचं मिश्रण लावलं आहे आणि हा झाडू घरातील कानाकोपऱ्यात फिरवा. यामुळे घरामध्ये किडे येऊ शकणार नाही. तसेच घरातील पाल पळवून लावता येईल, असा महिलेने दावा केला आहे. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो, असे महिलेचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)