Kitchen Jugaad Video : सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय सांगणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खूप हटके असतात तर काही व्हिडिओतून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर स्वच्छ व सुंदर दिसावं. घर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. घराचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे किचन, ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक बनवतो. किचन स्वच्छ व नीट नेटके ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. किचनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किचन सिंक.

किचन सिंक आपण नियमित वापरतो त्यामुळे किचन सिंकमध्ये चिकटपणा येतो. खरकटी भांडी सतत धुतल्याने दुर्गंधी येते. पण तुम्ही कधी किचन सिंक मध्ये शॅम्पू टाकला आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की किचन सिंक मध्ये शॅम्पू टाकल्यानंतर काय होते? सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किचन सिंक मध्ये शॅम्पू टाकायला सांगतात आणि पुढे याचा फायदा सुद्धा सांगतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : घरी रितेश, विवेक जेवायला आले अन् अक्षय कुमार ९.३० ला झोपायला गेला; वाचा अक्षयच्या दिनचर्येविषयी तज्ज्ञ काय सांगतात..

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रुपयाचा शॅम्पू किचन सिंकमध्ये टाकताना दिसेल. शॅम्पू किचन सिंक मध्ये सर्वत्र टाका. त्यानंतर खराब झालेला लिंबू किंवा चांगला लिंबू घ्या. त्या लिंबूचा रस सिंकमध्ये टाकलेल्या या शॅम्पूवर टाका त्यानंतर घासणीने किचन सिंक नीट व स्वच्छ घासून घ्या. आणि त्यानंतर सिंक स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या उपायाने तुमचे सिंक स्वच्छ होणारच पण त्याबरोबर सिंक मध्ये असलेली दुर्गंधी सुद्धा दूर होते. किचन सिंक मध्ये अडकलेला कचरा सुद्धा बाहेर पडतो आणि तुमचे किचन सिंक आरशासारखे चमकते.

पाहा व्हायरल व्हिडिओ

हेही वाचा : Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Simply. marathi इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किचन सिंक मध्ये शॅम्पूची कमाल”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान उपाय आहे. धन्यवाद.” तर एका युजर लिहिलेय, “छान माहिती” आणखी काही युजरने लिहिले, “हा उपाय मी सुद्धा करून बघणार”