इंटरनेटवर कोणत्या गोष्टीला नेटकऱ्यांची जास्त पसंती मिळेल सांगता येत नाही. मोटारसायकल हे तरुणांबरोबरच अनेकांचे पहिले प्रेम असते. मागच्या काही काळात मोटारसायकल कंपन्या दिवसागणिक आपली उत्पादने बाजारात दाखल करत आहेत. इतकेच नाही तर ग्राहकांची वाहवाही मिळवून जात आहेत. Jawa च्या बाईकची ग्राहक अनेक दिवसांपासून भारतात आतुरतेने वाट पाहत होते, कंपनीनेही अतिशय धमाकेदार आगमन केले आहे. आता ग्राहकांच्या याच उत्सुकतेचा अंदाज एका गोष्टीवरुन आल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे २०१८ मध्ये सर्वाधिक सर्च केलेली Jawa गाडी आहे.

२०१८ या एका वर्षात कंपनीने आपली दोन मॉडेल्स लाँच केली. यामध्ये Jawa आणि Jawa 42 या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या गाडीचे मोठ्या प्रमाणात बुकींग झाले असून दोन्ही बाईक्स मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी यावर्षी आणखी एक बाईक लाँच करणार आहे, तिचे नाव आहे Jawa Perak. याशिवाय Jawa नंतर गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली बाईक म्हणजे TVS Apache. यातही Apache RR 310 या गाडीला सर्वाधिक पसंती मिळाली. परफॉर्मन्स बाईक्समध्ये Apache हा एक उत्तम ब्रँड आहे. यामध्ये १६० ते ३१० सीसी पर्यंतच्या सर्व बाईक्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तर गुगल सर्चिंगमध्ये Suzuki Intruder ही तिसऱ्या क्रमांकावर सर्च केली जाणारी बाईक आहे. आकर्षक डिझाईन आणि कमी किंमत यामुळे या बाईकला ग्राहकांनी पसंती दिली होती.