scorecardresearch

Premium

Makar Sankranti 2022 Messages: मकर संक्रांतीनिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Wishes, Images, Quotes

याही वर्षी करोनामुळे एकत्र येऊन मकरसंक्रांती साजरी करता येत नसली तरी हे मराठमोळे शुभेच्छा संदेश पाठवून डिजीटल पद्धतीने हा सण साजरा करा.

Makar-Sankranti-2022

Happy Makar Sankranti 2022 : जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येतं. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी गावच्या जत्रा भरत असत. तसंच या दिवशी घरोघरी मेजवानी असायची, लोक पतंग उडवत असत. तीळ आणि गूळ यापासून प्रसाद बनवला जातो आणि ते कुटूंबातील सदस्यांमध्ये, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असं म्हणत दिला जातो. स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवतात. महाराष्ट्रीयन पेहरावात नटून-थटून येतात.

पण गेल्या दोन वर्षापासून जगावर सुरू असलेल्या करोना संकटामुळे मकरसंक्रांतीचा हा सण अगदी फिक्या पद्धतीने साजरे करावे लागत आहे. या नववर्षी तरी करोना देशातून हद्दपार होईल, अशी आशा लागलेली असतानाच करोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉन धडकला आणि पुन्हा लोकांच्या सण उत्सवावर संक्रांत आली. याही वर्षी आधीप्रमाणे आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत, घराबाहेर पडून पतंग उडवून हा सण साजरा करता येणार नसला, तरी तुम्ही शुभेच्छांच्या माध्यमातून जवळच्या माणसांसोबत हा सण साजरा करू शकता. तुमच्या व्हॉट्सअॅपवर वेगवगेळे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी (Makar Sankranti Wishes In Marathi), मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Makar Sankranti Messages In Marathi), मकर संक्रांतीसाठी खास कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi), मकर संक्रांती स्टेटस मराठी (Makar Sankranti Status In Marathi) ठेवून हा सण डिजीटल पद्धतीने साजरा करू शकता. म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मकरसंक्रांतीचे मराठमोळे शुभेच्छा संदेश….

Makarsankranti Marathi Wishes HD Images Free Download
मकरसंक्रांतीच्या मराठी शुभेच्छा फ्री डाउनलोड करून Whatsapp, FB ला ठेवा स्टेटस; साऱ्यांचा दिवस करा गोड
Gift Ideas for Makar Sankranti Haldi Kunku
Haldi Kunku Gift Ideas: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ १० भन्नाट आयडिया

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला….!
मकरसंक्रांतीनिमीत्ताने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा !!!

पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला-पावलावर भेटतात,
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात,
अशाच तिळगुळासारख्या गोड माणसांना
माझ्याकडून मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!!

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..

गोड तिळगुळांनी गोडवा वाटूया
गोड गोड बोलून नाती जपूया
संक्रांतीच्या सणाला कडू बोलणं सोडूया
सगळ्यांच्या जीवनात हर्ष हर्ष फुलवूया
तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोलूया…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

मनात असते आपुलकी
म्हणून स्वर होता ओला
हलवा तिळगुळ घ्या अन्
गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!

एक तीळ रुसला, फुगला,
रडत रडत
गुळाच्या पाकात पडला,
खटकन हसला
हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला,
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!!

आणखी वाचा : Makar Sankranti 2022 : नक्की कोणत्या दिवशी असणार मकर संक्रांती? १४ की १५ जानेवारी? आधी संक्रांत की किंक्रांत ? जाणून घ्या

Makar Sankranti Status In Marathi | मकर संक्रांती स्टेटस मराठी

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..
नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध..

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

आमच्याकडून गोड बोलण्याची कुणीही अपेक्षा ठेऊ नये
प्रत्येकाला जशास तसे उत्तरे देण्यात येतील

तिळगुळ तर हवेतच
पण त्याही पेक्षा
गोड अशी तुमची
दोस्ती हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

उंच नभी उडता पतंग संथ
हवेचा त्याला संग
मैत्रीचा हा नाजूक बंध
राहो नाते आपुले अखंड
मकरसंक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा !!!

खा भरपूर तिळगुळ
.
.
.
कारण
.
.
कोणाचाही कधी गुळ वाढलेला कधी ऐकला नाही
“साखर” वाढते!!!
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!

फक्त सण म्हणून गोड बोलू नका
चुकत असेल तर समजून सांगा
जमत नसेल तर अनुभव पण सांगा
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!!
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तिळात मिसळला गुळ
त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी
गोड गोड बोलू,
मकरसंक्रांत निमित्त आपणास व आपल्या परिवारास गोड गोड शुभेच्छा !!!

म….मराठमोठा सण
क….कणखर बाणा
र…..रंगीबेरंगी तिळगुळ
सं….संगीतमय वातावरण
क्रां….क्रांतीची मशाल
त….तळपणारे तेज
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमचं तिळ सांडू नका
आमच्याशी ऑनलाईन भांडू नका…
मकरसंक्रांतीच्या ऑनलाईन शुभेच्छा !!!

ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर
फक्त ऑनलाईनच
गोड बोलण्यात येईल…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

आणखी वाचा : Makar Sankranti 2020 : लहान मुलांचे का केले जाते बोरन्हाण? अशी करा तयारी; वाचा सविस्तर

Makar Sankranti Quotes In Marathi | मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!

गुळाइतका गोडवा
तुमच्या आयुष्यात
नेहमीच असु दे…
फक्त तिळाइतकी जागा
माझ्यासाठी असु दे…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हालव्यासंगे
अधिक दृढ करायचे!
तिळ गूळ घ्या…
आणि गोड गोड बोला!!

विसरूनी सर्व कटुता ह्रदयात
तिळगुळाचा गोडवा यावा
दुःख हरावी सारी
अन् आयुष्यात
सुखाचा सोहळा व्हावा!!!
मकसंक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा !!!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक
स्नेहांचा तिळ मिळवा त्यात
तिळावर फुलेल पाकाचा काटा
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा,
मक्याची रोटी आणि सरसोंचं साग,
मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा होऊ द्या मिलाप,
मकर संक्रातीच्या शुभेच्छा.

रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल
उत्तरेकडे सुरू करतो.
तशीच तुमची वाटचालही
यशाकडे होवो हीच इच्छा

पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून
तुम्हीही तुमच्या स्वप्नांना
या मकर संक्रांतीला घाला गवसणी

ट्विकंल ट्विकंल लिटील स्टार,
चला साजरा करूया संक्रांती वाणाचा सण बहार.

गोड गुळाला भेटला तीळ,
उडाले पतंग रमले जीव,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा काळ, नव्या दिशा.
नवी उमेद, नवीन आशा
विसरु आता दु:खे सारी सारी
पतंगासवे घेऊ आकाशी उंच भरारीमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Makar sankranti 2022 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi prp

First published on: 13-01-2022 at 19:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×