ख्यातनाम ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटरने(मॉरिस गॅरेज) गेल्या वर्षी ‘हेक्टर’ या कारद्वारे भारतीय बाजारात पदार्पण केल्यानंतर आता एमजी मोटर इंडियाने ही कार नवीन 6/7 सीटर व्हर्जनमध्ये लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित MG Hector Plus या आपल्या नव्या कारच्या प्रोडक्शनलाही सुरूवात केली आहे. Hector Plus ची भारतात लाँच झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, Tata Gravitas आणि Mahindra XUV500 यांसारख्या गाड्यांसोबत टक्कर असेल.

गुजरातच्या हलोल येथील प्रकल्पात हेक्टर प्लसच्या उत्पादनाला सुरूवात झाली आहे. ही कार कंपनीने सर्वप्रथम ऑटोएक्सपो 2020 मध्ये सादर केली होती. पुढील महिन्यात MG Hector Plus (6 सीटर )  लाँच होईल. पण, 7 सीटर व्हर्जनसाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. 7 सीटर व्हर्जन वर्षाअखेरीस लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

Why the uproar over inheritance tax How long was this law in India
वारसा करावरून एवढा गदारोळ का? हा कायदा भारतात कधीपर्यंत होता? जगात कोणत्या देशांमध्ये आकारला जातो?
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
Is Electoral Bonds Watergate in India
निवडणूक रोखे हे भारतातील वॉटरगेट?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?

नव्या कारला थिक एलईडी डीआरएल, ऑल-ब्लॅक ग्रिल, रेस्टलेड फ्रंट बंपर, हेडलाइट आणि फॉग-लँप क्लस्टर, रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्सद्वारे पूर्ण नवीन डिझाइन देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. कारच्या मधल्या ‘रो’मध्ये कॅप्टन सीट आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वोत्कृष्ट आरामाचा अनुभव मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. “हेक्टर प्लस ही विशेषत्वाने कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली असून यात मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट असून तिसऱ्या रोमध्ये किशोरवयीन मुलांसाठी जागा आहे. हेक्टर ब्रँडच्या फॅमिलीत समाविष्ट झालेली हेक्टर प्लस ही आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आणि अतुलनीय आरामदायी असल्याने ती स्मार्ट चॉइस असेल”, असे एमजी मोटर इंडियाचे प्रमुख प्रकल्प अधिकारी मनीष मनेक म्हणाले.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हेक्टरची किंमत 12.73 लाख रुपये ते 17.43 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hector Plus च्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण या कारची किंमत इनोव्हा क्रिस्टापेक्षा एक-दोन लाख रुपये कमी असू शकते. जवळपास 16 लाख रुपये इतकी या कारची बेसिक एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे.