Premium

Parenting Tips: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

मुलांची काळजी घेताना, आईने काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये असे गुण विकसित होतील जे त्याला आयुष्यात पुढे जाण्यास आणि एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करतील.

Things Mother Should Keep In Mind
प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत या गोष्टी (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

Good Parenting: कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची आई महत्त्वाची व्यक्ती असते. आई ती असते जी मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याचे योग्य संगोपन करून समाजात वावरण्यास सक्षम बनवते. आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो. परंतु, मुलांची काळजी घेताना, आईने काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये असे गुण विकसित होतील जे त्याला आयुष्यात पुढे जाण्यास आणि एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत या गोष्टी

संयम सर्वात महत्वाचा आहे
मुलाचे संगोपन करताना आईने संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे. लहान मुलं तांडव करतात, हट्टी असतात आणि अनेक चुका करतात, अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभळले पाहिजे.

स्वतःवर विश्वास ठेवायला शिका
मुलाचे संगोपन करताना सल्ला देणारे बरेच लोक आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन करत असाल तेव्हा तुमची स्वतःची समज असणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही बाबतीत तुमचे मन आणि तुमचा विचार काय आहे हे खूप महत्वाचे ठरचे. तुम्ही इतरांचा सल्ला ऐका परंतु कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही हे लक्षात ठेवा.

हेही वाचा – झिंक थकवा दूर करण्यासाठी आणि उर्जा पातळी वाढवण्यास ठरू शकते का फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितले कसे करावे सेवन?

मुलांसह स्वतःची काळजी घ्या
जेव्हा तुम्ही मुलाचे संगोपन करता तेव्हा तुमचा बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात जातो. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका. आई असण्यासोबतच तुम्ही एक माणूस देखील आहात, त्यामुळे तुमचे छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी वेळ काढा.

मदती मागण्यासाठी लाजू नका
अनेक वेळा आई थकून जाते कारण मुलाकडे खूप काम असते. त्यामुळे याबाबतीत तुमच्या कुटुंबीयांची किंवा मित्रमंडळींची मदत घेणे ही वाईट गोष्ट नाही. एकमेकांच्या मदतीनेच कुटुंबे टिकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा कामाचा ओझं स्वतःवर घेता तुम्ही कुटुंब आणि मित्रांची मदत घेऊ शकता.


हेही वाचा –तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही पडू शकता नैराश्याला बळी, आजपासून बदला या वाईट सवयी

आपल्या चुकांमधून शिका
जगात कोणीही परिपूर्ण नाही. तुमच्याही पालकत्वात चुका होऊ शकतात. या गोष्टी मनावर घेण्याऐवजी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून धडा घ्यावा.

मुलांच्या मैत्रीवर लक्ष ठेवा

आपल्या मुलांना चांगली संगत देणे हे आईचे कर्तव्य आहे. तुम्ही लोकांमध्ये राहता ते त्याचे वर्तुळहीअसेल. तुमचे मुलं त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकेल. त्यामुळे तुम्ही लहान बाळाच्या आसपास कोणत्या लोकाचे वर्तूळ तयार करत आहात याबाबत सजग राहा. आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा आणि त्याच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. यासह, तुमचे मूल तुमच्यासारखे जीवन जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकतील.

खूप कडकपणा आवश्यक नाही
जर तुमचे मूल काही शिकत नसेल किंवा ते खूप त्रास देत असेल, तर फार कठोर वागण्याची गरज नाही. मुलं निरागस असतात, एक क्षण रडतात आणि दुसऱ्या क्षणी हसतात. त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा, समजावून सांगा आणि मूल किती आनंदी राहते ते पहा.

मुलांना अट घालून किंवा आमिष दाखवू काम करण्यास भाग पाडू नका
कोणत्याही कामासाठी मुलाला काहीही देण्याची अट नसावी. ते काम करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. पण त्याला काही काम केले तरच बक्षीस मिळेल, अशा अटी घालू नयेत. तसेच त्याला कोणत्याही गोष्टीचे आमिष दाखवून कोणतेही काम करण्यास भाग पाडू नये. असे केल्याने, तुमचे मूल प्रत्येक कामात लोभला अग्रस्थानी ठेवेल आणि जीवनात पुढे जाण्यात अडचणी येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parenting tips things mothers should keep in mind while bringing up children snk

First published on: 25-09-2023 at 18:29 IST
Next Story
Mental Health Special: गेमिंग आणि पॉर्नची एकमेकांना संगत?