चित्रपट पाहणे कोणाला आवडत नाही. काहींना चित्रपटांचे डायलॉग कॉपी करायला आवडतात, तर काहीजण त्यांच्या आवडत्या अभिनेत्या-अभिनेत्रींना फॉलो करायला आवडते. अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या तिच्या फिटनेस आणि फिगरमुळे फारच चर्चेत आहे. ४० वर्षांनंतरही तंदुरुस्त आणि सक्रिय दिसणार्‍या अभिनेत्रीच्या यादीत प्रिती झिंटाचे नाव समाविष्ट आहे. प्रीती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासनतास जिममध्ये व्यायाम करत असते, तर तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिने खास डाएट प्लॅनही फॉलो केला आहे. प्रीती झिंटा अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून तिचा वर्कआउट प्लॅन चाहत्यांसोबत शेअर करत असते. चला तर मग जाणून घेऊयात प्रीती झिंटाच्या ‘फिटनेस मंत्रा’बद्दल. ज्याचा अवलंब करून तुम्हीही निरोगी जीवनशैली जगू शकता.

प्रीती झिंटाचा वर्कआउट रूटीन

प्रीतीला जिममध्ये काही खास व्यायाम करायला आवडतात, ज्यामध्ये डंबेलच्या मदतीने बायसेप्स, ट्रायसेप्स आणि एंडोर्फिन हे तिच्या फिटनेस रूटीनचा भाग आहेत.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

पुश-अप करणे

पुश-अप्स व्यायाम हा प्रितीच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे. यासोबतच प्रीती रोज अर्धा तास योगा, धावणे आणि पोहण्यात घालवते.

फिटनेस रुटीनमध्ये नृत्याचा समावेश

प्रीती झिंटाच्या फिटनेस रूटीनमध्ये डान्सचाही समावेश आहे कारण तिला डान्स करायला आवडते. त्यामुळे कधी-कधी व्यायाम करायला नाही जमलं किंवा काही कारणास्तव जिमला जाता आले नाही तर प्रीती घरीच डान्स करते. यामुळे तिचे शरीर खूप तंदुरुस्त आणि सक्रिय राहते. ती पिलेट्स व्यायाम देखील करते. जो मनाचा-शरीराचा व्यायाम आहे.

पुरेशी झोप घेणे

तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैलीसाठी पुरेशी शांत आणि गाढ झोप घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे, असे प्रीती झिंटाचे मत आहे.

असाच काहीसा आहे प्रीती झिंटाचा रोजचा आहार

प्रीती झिंटा सकाळचा नाश्ता करायला विसरत नाही. त्याच वेळी, तिच्या दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने होते. प्रीतीच्या नाश्त्यात जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात.

हेल्दी आहार हे प्रीतीच्या आरोग्याचे रहस्य आहे

प्रीती झिंटाने तिच्या आहारात ताज्या आणि सेंद्रिय गोष्टींचा समावेश केला आहे. त्याचबरोबर प्रीती फिट राहण्यासाठी फळांचे ज्यूस घेते.

खूप पाणी पिणे

पाणी प्यायल्याने सर्व विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात. तसेच शरीर चांगले हायड्रेटेड राहते. यामुळेच प्रीती दिवसभरात भरपूर पाणी पिते. त्याचबरोबर दिवसातून एकदा नारळ पाणी पिणे हा देखील प्रीतीच्या आहाराचा एक भाग आहे.