Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन आता इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुनही खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन Mi.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळवरच विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता हा फोन Flipkart वरही उपलब्ध झाला आहे. @RedmiIndia या ट्विटर हँडलवरुन हा फोन आता फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी, जाणून घ्या ऑफर्स

शाओमीने रेडमी नोट 8 सीरिजअंतर्गत रेडमी नोट 8 (Redmi Note 8) आणि रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) हे दोन फोन गेल्या वर्षी लाँच केले. नोट 8 सीरिजला भारतात उदंड प्रतिसाद मिळाला आणि लाँचिंगनंतर काही महिन्यांमध्येच या फोनची 1 कोटीहून अधिक विक्री झाली होती. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा 5 पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

किंमत –
6GB रॅम + 64GB स्टोरेज – 15 हजार 999 रुपये,
6GB रॅम + 128GB स्टोरेज – 16 हजार 999 रुपये
8GB रॅम + 128GB स्टोरेज – 18 हजार 999 रुपये

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi note 8 pro now available via flipkart also know price specifications and all other details sas
First published on: 19-05-2020 at 15:02 IST