दूध हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यातून शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक मिळतात. लहान मुलांसाठी तर दूध हे सर्वाधिक पोषण देणारे उत्तम अन्न असते. यामध्ये आयोडिन, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, व्हीटॅमिन, फॉस्फरस हे सर्व घटक असतात. मात्र दूध पिताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तशी काळजी घेतल्यास शरीराला योग्य तो फायदा होतो. अन्यथा शरीराला नुकसान पोहोचते. कोणत्या पदार्थांबरोबर दूध पिणे शरीराला घातक ठरु शकते पाहूयात.

रिकाम्या पोटी दूध पिणे

सकाळी उठल्यावर दूध पिण्याची सवय अनेकांना असते. मात्र असे रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीतरी खाऊन मगच दूध प्यावे. किंवा किमान दूधासोबत काहीतरी खावे.

मीठ घातक

दूध आणि मीठ हे दोन पदार्थ कधीच एकत्र खाऊ नयेत. आपण काही वेळा नमकीन पदार्थ दूधासोबत खातो. त्यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनशक्ती कमी होते.

आंबट पदार्थ टाळा

दूधासोबत आंबट पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे दही, लिंबू आणि संत्री यांसारखे पदार्थ दूधासोबत खाणे टाळावे.

मासे

दूध आणि मासे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास त्वचेचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे ते टाळावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)