Royal Enfield ने भारतीय बाजारात गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये Bullet Trials ही नवीन बाइक Bullet Trials 350 आणि Bullet Trials 500 अशा दोन प्रकारात लाँच केली होती. पण वर्षभरातच कंपनीने या बाइकचं प्रोडक्शन थांबवल्याची माहिती आहे. कंपनीने ही बाइक आपल्या वेबसाइटवरुनही हटवलीये. तर, काही दिवसांपूर्वीच कंपनीने भारतीय बाजारात BS6 इंजिनसह आपली लोकप्रिय Classic 350 ही ‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट लाँच केलीये.

ग्राहकांकडून मागणी अत्यंत कमी असल्यामुळे Royal Enfield ने Bullet Trials 350 आणि Bullet Trials 500  या दोन्ही बाइक बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. कंपनीच्या स्टँडर्ड बुलेट 350 वर आधारित ही स्क्रॅम्बलर स्टाइल बाइक ऑफ-रोड रायडिंगचा विचार करुन बाजारात आणली होती. Royal Enfield Bullet Trials 350 ची एक्स शोरुम किंमत 1.62 लाख रुपये, तर Bullet Trials 500 ची किंमत 2.07 लाख रुपये इतकी होती.

person types upside down english letters in just 2.88 seconds
तुम्ही २.८८ सेकंदामध्ये किती अक्षरं लिहू शकता? या भारतीयाने उलटं लिहून केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO
Toyota Rumion G automatic variant launch
Maruti Ertiga, Kia Carens समोर तगडं आव्हान, टोयोटाच्या MPV कारचा नवा व्हेरिएंट देशात दाखल, किंमत फक्त…
Viral Video Indian Man bagged Guinness World Record title after solving rotating puzzle inside a soap bubble
VIDEO: वा रं पठ्ठ्या! भारतीय तरुणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद; सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, पण कसं ते पाहा
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?

दुसरीकडे, कंपनीने आपला देशभरातील बीएस-4 गाड्यांचा स्टॉक संपवला आहे. कंपनीने क्लासिक आणि बुलेट मॉडेलला बीएस6 इंजिनमध्ये अपडेट केले असून लवकरच बीएस6 थंडरबर्ड 350 आणि थंडरबर्ड 350एक्स या दोन बाइक लाँच करण्याची शक्यता आहे.