भारतात बेरोजगार लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. रेज्युमे पाठवणे, इंटरव्ह्यू देणे या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात आणि एवढं करूनही नोकरी मिळेल याची काही खात्री नाही. ही सर्व मोठी प्रक्रिया आहे ज्याला वेळ द्यावा लागतो. नोकरी मिळवण्यासाठी लोक कित्येक गोष्टी करत असतात. वेगवेगळे कोर्स करतात, सर्टिफिकेट मिळवतात, सतत रेस्म्युमे अपडेट करतात, लिक्डइन सारख्या अॅपवर आपले प्रोफाईल अपडेट करतात. सतत चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. अशाच एका नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाची सोशलम मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने भन्नाट शक्कल लढवली आहे. जे पाहून सर्व जण थक्क झाले आहे. नोकरी शोधताना लोक जास्ती जास्त चांगल्या पगार मिळेल अशी अपेक्षा करतात पण या तरुणाने एका स्टार्टअप संस्थापकालाच नोकरीसाठी पैसे देण्याची ऑफर दिली आहे.

बंगळुरूस्थित सॉफ्टवेअर कंपनी विंगीफाय (विंगीफाई) चे संस्थापक पारस चोप्रा यांनी अलीकडेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या एका तरुणाकडून एक हटके ऑफर मिळाली आहे. “नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणाने कंपनीत काम करण्यासाठी अर्ज केला आहे. जर त्याला नोकरी मिळाली तर तो संस्थपकाला $५०० (अंदाजे रु. ४१,०००) देईल” असे चोप्रा यांनी सांगितले.

तरुणाच्या प्रयत्नावर खुश झाले चोप्रा

पारस चोप्रा यांनी सोशल मीडियावर त्याच्या मेसेसजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणाने हटके ऑफर दिल्याचे दिसते. चोप्रा यांनी स्पष्ट केले की, ते नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणाकडून कोणतेही पैसे घेणार नाही पण त्याचा या प्रयत्न पाहून ते प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा – “रोज उशीरा शाळेत येते म्हणत..” सुरु झाला शिक्षिका अन् प्राचार्यामध्ये वाद, मारामारीचा Video Viral

हेही वाचा – Viral Vada Pav Girl चंद्रिका दीक्षितच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांनी केला खुलासा! वाचा, व्हायरल व्हिडीओचे सत्य

अर्जदाराने मेसेजमध्ये काय लिहले आहे?

मेसेजमध्ये, नोकरीसाठीअर्ज करणाऱ्या तरुणाने लिहिले की, “विंगीफायमध्ये नोकरी मिळाल्यास$५०० (अंदाजे रु. ४१,०००) देईन. जर ते त्यांचे काम सिद्ध करू शकॉले नाहीत, तर पहिल्या आठवड्यानंतर कंपनी त्यांना कामावरून काढून टाकू शकते आणि तो पैसे परत मागणार नाही.”

हेही वाचा – नवरा राहिला बाजूला सासूच्या प्रेमात पडली सुन! Viral Videoमध्ये सासूबाई म्हणे, “ती मला जबरदस्ती..”

पारस चोप्राच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. काही लोकांनी या व्यक्तीच्या धाडसाचे आणि उत्कटतेचे कौतुक केले तर काही लोकांनी ही पद्धत चुकीची असल्याचे सांगितले.

परिणाम काहीही असो, आजच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी लोक किती कठीण आणि हटके मार्गांनी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे हे यातून सिद्ध होते. या व्यक्तीला नोकरी मिळाली की नाही हे सांगणे कठीण असले तरी त्याचे हे प्रयत्न कंपनी आणि इतरांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.