Samsung कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी M31 (galaxy M31) लाँच केलाय. या फोनचा उल्लेख कंपनीने ‘मेगा मॉन्स्टर’ असा केलाय. मेगा कॅमेरा आणि मेगा बॅटरी असलेल्या या फोनमध्ये मेगा डिस्प्लेही देण्यात आलाय. पाच मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून निवडक रिटेल स्टोअर्स, अ‍ॅमेझॉन इंडियाचे संकेतस्थळ आणि सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत. मागील बाजूला चार कॅमेरे तर सेल्फीसाठी एक कॅमेरा पुढील बाजूला आहे. Galaxy M31, हा सॅमसंगची लोकप्रिय Galaxy M मालिकेतील नवा फोन आहे.

फीचर्स:-
फोनच्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप म्हणजे 4 कॅमेरे आहेत. यातील 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 5MP चा मॅक्रो कॅमेरा, 5MP चा डेप्थ कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. तुम्ही या फोनमध्ये स्लो-मोशनसह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतात. हायपरलॅप्स, Slow-mo आणि सुपर-स्टेडी मोड्स यांसारखे शानदार कॅमेरा फीचर्स यामध्ये आहेत. याशिवाय 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6,000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी 29 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक, 49 तास व्हॉइस कॉल आणि 131 तासांचा म्यूझिक प्लेबॅक सपोर्ट मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

किंमत:-
Samsung Galaxy M31 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ओशियन ब्लू आणि स्पेस ब्लॅक अशा दोन कलरच्या पर्ययांमध्ये उपलब्ध असेल. Samsung Galaxy M31 मध्ये 6.4 इंचाचा इंफीनिटी U FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. 191 ग्रॅम वजन असलेल्या या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर असून Android 10 वर आधारित Samsung One UI 2.0 वर हा फोन कार्यरत असेल.