स्वस्त, सुंदर, टिकाऊ.. आपल्या भारतीय बाजारपेठेत या गोष्टीला खूप महत्त्व आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘शिओमी’ ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले मोबाइल घेऊन आली आहे. ‘शिओमी’ने मागच्या वर्षी ‘रेडमी नोट थ्री’ हा फोन भारतामधे उपलब्ध केला आणि पूर्ण वर्षभर या मोबाइलने भारतीय बाजारपेठेत अधिराज्य केलं. ‘शिओमी’ने आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी ‘रेडमी नोट थ्री’ची पुढची आवृत्ती ‘रेडमी नोट फोर’ भारतात आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यात ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला आहे, कारण यात २.५ डी ग्लास लावण्यात आली आहे ज्यामुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो आहे. ‘रेडमी नोट फोर’चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टू जीबी – थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे तीन प्रकार निवडू शकता. हा मोबाइल पूर्णपणे मेटलचा बनविण्यात आला आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता. या प्रोसेसरचे वैशिष्टय़ असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता. शिवाय यात ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर एक ते दीड दिवस सहज वापरू शकता. ‘रेडमी नोट फोर’मध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे. परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone redmi note 4 mobile and including price review in marathi
First published on: 22-02-2017 at 12:08 IST