Jugaad Video : सध्या उन्हाळा सुरू आहे. प्रत्येकजण लिंबू पाणी पिण्यासाठी घरी लिंबू आणतात. अनेकदा काही लिंबूचा वेळेवर वापर न केल्यामुळे ते सुकून जातात. असे सुकलेले लिंबू आपण अनेकदा फेकून देतो पण आता असे कधीही करू नका. सुकलेले लिंबाचा तुम्ही पुन्हा उपयोग करू शकता, ते कसे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Summer Hacks never throw dried lemon try this hack and reuse it)

तुमच्यापैकी अनेकांच्या घरी सुकलेले लिंबू असेल तर ते लिंबू फेकायचा विचार करत असाल तर आताच थांबवा. या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – सुरुवातीला या सुकलेल्या लिंबाच्या उभ्या फोडी कापा. या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.त्यात तीन चमचे मीठ, एक चमचा बेकींग पावडर, दोन चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे डिटर्जंट पावडर टाका. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा आणि बारीक केलेली पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या. ही पेस्ट तुम्ही कोणतेही भांडे घासताना वापरू शकता. अॅल्युमिनियम, पितळ, तांब्याचे भांडे तुम्ही या पेस्टनी घासू शकता. हलक्या हाताने घासले तरी तुमच्या भांड्यावरचा सर्व काळवटपणा निघून जाईल. तुम्ही ही पेस्ट एकापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू शकता आणि वापरू शकता. ही ट्रिक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये भांडे स्वच्छ करून सुद्धा दाखवले आहेत.

never throw away used chaipatti or tea leaves after making chai
Kitchen Jugaad : चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्ती फेकू नका; असा वापर करा, पाहा VIDEO
How To Clean Water Tanki Before Monsoon
१० रुपयांत टाकीतला गाळ करा गायब, पाणी नेहमी राहील स्वच्छ; टाकीत उतरण्याची पण गरज नाही, सहज जुगाडाचा Video पाहा
Kitchen Jugaad Video
Kitchen Jugaad Video: सिलेंडर रिकामा होताच सर्वात आधी त्याखाली पिशवी ठेवा; मोठं नुकसान टळेल
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

हेही वाचा : Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : फक्त १५ मिनिटांमध्ये होईल कमाल! गव्हाच्या पिठाने पळवा घरातील लाल मुंग्या; VIDEO पाहाच

diplakshmi123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुकलेले लिंबू फेकून देता तर थांबा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लिंबू महाग आहे, त्यापेक्षा पितांबरी बरी” तर एका युजरने लिहिलेय,”छान उपयोगी व्हिडीओ आहे. धन्यवाद ताई. ही पेस्ट किती दिवस फ्रिजमध्ये टिकेल?” त्यावर सांगितले आहे की ही पेस्ट फ्रिजमध्ये आठवडाभर सहज टिकेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी सरळ कुकरमध्ये टाकून देते असे लिंबू, कुकर स्वच्छ होतो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी लाइक आणि कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी या ट्रिकपेक्षा पितांबरी आणि भांडी घासायची साबण बरी असे लिहिलेय.