Monsoon Hair Care: जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हे हवामान खूप आनंददायी असू शकते, परंतु सावधगिरी बाळगणे कधीही विसरू नये. कारण या ऋतूत आजारांचा सर्वाधिक धोका असतो. या ऋतूतील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे केसांची समस्या. खरंतर घराबाहेर पडताना अनेक वेळा ओले होतात. त्यामुळे केस चिकट आणि कोरडे होतात. यामुळे फंगल-बॅक्टेरियाचा धोकाही वाढतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर काही सोप्या टिप्स पाळल्या पाहिजेत, ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यात तुमचे केस निरोगी ठेवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

३ प्रकारे दूर करा केसांचा चिकटपणा

केस कमीत कमी धुवा :
पावसाळ्यात कमी वेळा धुवावेत जेणेकरून केसांमध्ये ओलावा कमी राहील. पावसाळ्यात वारंवार केस धुण्यामुळे टाळूमध्ये आर्द्रता निर्माण होते, ज्यामुळे केस निर्जीव आणि अधिक कोरडे दिसतात. अशा परिस्थितीत केस गळण्याची समस्या सामान्य होते. याशिवाय केस वारंवार ओले केल्याने सर्दी, डोकेदुखी इ. यासोबतच फंगल-बॅक्टेरियाचा धोकाही वाढू शकतो.

Black Salt Water Benefits
तुमचेही केस खूप गळतात का? काळ्या मिठाचं पाणी प्या अन् फरक बघा; जाणून घ्या योग्य पद्धत
pune heavy rainfall causes trees to fall
पहिल्याच पावसात पुणे ‘पाण्यात’ : मुसळधार पावसामुळे पंधरा ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी
IAS officer posts close-up video of leopard drinking from waterhole amid scorching heat
कडक्याच्या उन्हात शांतपणे पाणी पितोय तहानलेला बिबट्या, IAS अधिकाऱ्याने शेअर केला दुर्मिळ क्षण
Hospitals, Mumbai,
मोसमी पावसासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज
Tigress, cubs, swimming,
Video: वाघिणीचा चार बछड्यांसह जलविहार; नवेगाव-नागझिऱ्यातील या व्हिडिओने लावले वेड
dams, Thane, steam,
बाष्पी भवनामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत घट, पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही
diy summer health care tips 4 things to avoid after returning home from heat in marathi
उन्हातून घरी परतल्यानंतर ३० मिनिटे चुकूनही करू नका ‘या’ चार गोष्टी; अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा
loksatta analysis why when and how water supply cut impose in mumbai
विश्लेषण : मुंबईत का, कधी आणि कशी केली जाते पाणी कपात?

हेही वाचा – तुमच्या कुकरमध्ये रोज भात करपतो का? मग हे ३ सोपे उपाय वापरून पाहा

नियमित तेल लावणे:
मान्सून उंबरठ्यावर येताच सावध व्हायला हवे. केसांपासून त्वचेपर्यंतच्या अनेक समस्या या ऋतूत वाढतात. बदलत्या ऋतूनुसार केसांना पूर्ण पोषण दिले पाहिजे. असे न केल्याने केस निर्जीव होऊन गळू लागतात. यासाठी केसांना नियमित तेल लावणे आवश्यक आहे. याशिवाय दर १५ दिवसांनी केसांना डीप कंडिशनिंग करा. असे केल्याने केसांना पूर्ण पोषण मिळेल.

iहेही वापरा – लाकडी फर्निचरवर स्क्रॅच पडलाय का? आक्रोडाचा छोटा तुकडा ठरेल उपयोगी; अगदी नव्यासारखे दिसू लागेल

सफरचंद सायडर व्हिनेगरची मदत घ्या:
पावसाळा केसांसाठी अनेक समस्या घेऊन येतो. यासाठी केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात टाळूवर जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे केसांची पीएच पातळी खराब होऊ शकते. याशिवाय केस चिकट होऊ लागतात. ही समस्या टाळण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात थोडेसे ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. यानंतर केस धुवा. असे केल्याने केसांमध्‍ये जमा झालेले अतिरिक्त तेल दूर होते. पण, कोणत्याही परिस्थितीत तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.