Video How To Clean Sticky Oil Bottle: अलीकडे ऑनलाईन शॉपिंग स्वस्त झाल्याने घरगुती वस्तूंची मागणी खूप वाढली आहे. ‘हे गॅजेट तुमचा किचनमधला वेळ कमी करेल’ अशा जाहिराती तर तुम्हीही रोज बघत असाल. कितीही स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी या वस्तू विकत घेण्याचा मोह काही वेळा आवरत नाही.सजावटीच्या, किचनमध्ये वापरण्याच्या, कपाटात वस्तू लावून ठेवण्याच्या या फॅन्सी वस्तू दिसायला सुंदर आणि खर्चाला स्वस्त असल्या तरी त्यांची काळजी सुद्धा घ्यावी लागते. म्हणजे बघा अलीकडे तेलाच्या बॉटल्सचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पोळीवर तेल लावायला असलेला ब्रश किंवा भाजीत फोडणीला कमी तेल पडावं यासाठी असणारं नोझल, तुम्ही म्हणाल त्या सुविधा देणाऱ्या या बॉटल्स मॉडर्न किचनला शोभूनही दिसतात पण मुद्दा आहे स्वच्छतेचा!

पूर्वीची तेलाची भांडी काथ्याने, किंवा नारळाच्या शेंडीने, चुलीतल्या राखेने घासली की चिकटपणा, दुर्गंध उडन छू व्हायचा. पण प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटलचा चिकटपणा किंवा कुबट दर्प घालवायचा कसा, आज आपण याच प्रश्नाचं सोपं उत्तर पाहणार आहोत.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Patanjali Expresses Regret
एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

तेलाच्या चिकट बाटलीचे डाग कसे काढावे?

@priya_dwarke या अकाउंटवर शेअर केलेल्या हॅकनुसार तेलाची बॉटल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला तांदूळ वापरायचा आहे. आधी तेलाच्या बाटलीत तांदूळ घाला व त्यात थोडं गरम पाणी घालून बॉटल हलवून घ्या. तांदूळ एखाद्या स्क्रबसारखा काम करून चिकटपणा कमी करण्यास मदत करू शकतो. तेलाच्या बॉटलचा दर्प कमी करण्यासाठी तांदळात भांडी घासायच्या साबणाचे तुकडे किंवा लिक्विड सुद्धा मिसळू शकता. गरज भासल्यास प्लॅस्टिकच्या काथ्याने बाहेरून हलक्या हाताने बॉटल घासून घ्या.

हे ही वाचा<< चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?

याशिवाय काहींनी कमेंट्समध्ये बॉटल्स स्वच्छ करण्यासाठी अनेक पर्याय सुचवले आहेत. जसे की आपण किचन टिश्यू किंवा कागद भांडी घासायच्या लिक्विडमध्ये भिजवून बॉटलमध्ये घालून ठेवावा ज्यामुळे कागद चिकटपणा शोषून घेईल. बेकिंग सोडा व भांड्याच्या साबणाचे द्रावण बनवून आपण बॉटलमध्ये घालून ठेवू शकता. या दोन्ही पर्यायांचा सुद्धा वापर करू शकता पण यासाठी लागणारा वेळ थोडा जास्त असू शकतो.