स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपल्या Vivo V20 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. किंमतीतील कपातीसह Vivo V20 हा स्मार्टफोन आता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे. कंपनीचा हा फोन आता 2,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Vivo V20 नवीन किंमत :-
कंपनीने गेल्या वर्षी Vivo V20 हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये 24 हजार 990 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. आता याची किंमत 22 हजार 990 रुपये झाली आहे. तर, 8 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आता 25 हजार 490 रुपये झाली आहे. यंदा आयपीएल सुरू होण्याआधी कंपनी Vivo V21 हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे, त्यामुळे कंपनीने Vivo V20 च्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केल्याचं बोललं जात आहे.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Maruti Suzuki Grand Vitara Waiting Period
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला…
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

Vivo V20 स्पेसिफिकेशन्स :-
ड्युअल नॅनो सिम कार्डचा सपोर्ट असलेला Vivo V20 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित Funtouch 11 वर कार्यरत आहे. यात 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G चिपसेटचा सपोर्ट आहे. फोनमध्ये 8GB रॅमसोबत 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटचे दोन पर्याय आहेत. शिवाय स्टोरेज माइक्रो-एसडीकार्डच्या मदतीने वाढवता येणंही शक्य आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेल क्षमतेचा आहे, तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 8-मेगापिक्सेल (अल्ट्रावाइड लेन्स) आणि 2 मेगापिक्सेल (डेप्थ सेन्सर) आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh ची बॅटरीही आहे. गेमप्रेमींसाठी या फोनमध्ये अल्ट्रा गेम मोड देण्यात आला आहे. हा फोन मिडनाइट जॅज, सनसेट मेलोडी आणि मूनलाइट सोनाटा अशा तीन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट यांसारखे अनेक शानदार फिचर्सही आहेत.