ब्रिटिश आरोग्यतज्ज्ञांचा दावा
रात्री लवकर आणि पुरेशी झोप मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. अशा झोप न लागणाऱ्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन करावे, असा सल्ला लंडनमधील वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. कारण विशिष्ट घटकांचा समावेश असलेल्या डॉर्क चॉकलेटचे सेवन केल्याने रात्री चांगली झोप लागत असल्याचा दावा या वैद्यकीय तज्ज्ञांनी संशोधनाअंती केला आहे.
डार्क चॉकलेट, काजू आणि पालेभाज्या यांसारख्या अनेक पदार्थामध्ये आढळणाऱ्या ‘मॅग्नेजिम’ या घटकामुळे चांगली झोप लागते. डार्क चॉकलेटमध्ये हे घटक अधिक प्रमाणात असतात, असे एडिनबर्ग आणि केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.
मानवी मेंदूकडून शरीराची नियमितता राखली जाते. मेंदूमध्ये असलेल्या कार्डिअन ऱ्हिदम या कार्यपद्धतीद्वारे ही नियमितता राखली जाते. कार्डियन ऱ्हिदमचे कार्य एखाद्या घडय़ाळाप्रमाणे चालले. झोपण्याची आणि झोपेतून उठण्याचा कालावधी या कार्यपद्धतीद्वारे ठरत असतो. मॅग्नेजिम हा पदार्थघटक या कार्यपद्धतीचे कार्य सुधरवण्यास मदत करतो. त्यामुळे झोप चांगली लागते, असे एडिनबर्ग विद्यापीठाचे गार्बेन ओजेन यांनी सांगितले. यासाठी संशोधकांनी बुरशी, एकपेशीय वनस्पती आणि मानवी पेशी या जैविक जीवांचा आण्विक परीक्षणातून अभ्यास केला. त्यात संशोधकांना मॅग्नेजिमचा कमी-अधिक प्रमाणात होणारी क्रिया शरीरातील पेशींना दिवसभरासाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या संवर्धनाशी संबंधित असल्याचे दिसून आले. तर मॅग्नेजिम असण्याने पोषक आहारातून पेशींसाठीच्या ऊर्जेत रूपांतर करण्याचे कार्यदेखील होत असल्याचे दिसून आले. केंम्ब्रिज विद्यापीठाचे जॉन ओनेल यांच्या मते, हे नवसंशोधन मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठीदेखील हितकारक आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार