आजकाल प्रत्येक घरात कपडे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. मशीनच्या मदतीने कपडे काही मिनिटांत आणि कोणत्याही प्रयत्नाशिवाय अगदी स्वच्छ होतात. यात आजकाल कपडे धुण्यासाठी अशा मशीन्स आल्या आहेत, ज्यात अनेक प्रकारचे मोड आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही रेशीम आणि लोकरीसारखे नाजूक कपडेदेखील स्वच्छ करू शकता. यात बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये ठेवले तर त्यावर लिंट तयार होते आणि ते पटकन निघत नाही. इतकेच नाही तर ज्या लोकांच्या घरात पाळीव कुत्रा किंवा मांजर आहे, त्यांची समस्या अशी आहे की, पाळीव प्राण्यांचे केस कपड्यांवर अडकतात आणि वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतरही ते साफ होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वरील सर्व समस्यांवर मात करू शकता.

वॉशिंग मशीनमध्ये टाका फक्त ‘ही’ गोष्ट, मग पाहा कमाल

प्रत्येकाला वेट वाइप्सबद्दल माहीतच असेल. आजकाल, वेगवेगळ्या प्रकारचे वेट वाइप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी बेबी वाइप्स आणि मेकअप रिमूव्हर वेट वाइप्स खूप सामान्य आहेत. आत्तापर्यंत तुम्ही त्यांचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापर केला असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही हे वाइप्स वॉशिंग मशीनमध्ये टाकले तर ते कपडे अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यास मदत करू शकतात.

do you hear pune pmt bus story
फक्त पन्नास रुपयांमध्ये संपूर्ण पुणे फिरवणाऱ्या पीएमटीची गोष्ट ऐकली का? VIDEO VIRAL
Put a pinch of salt or a spoonful of oil in an iron and steel bowl and see what happens
लोखंड आणि स्टीलच्या भांड्यात चिमुटभर मीठ किंवा चमचाभर तेल टाकून पाहा काय होईल कमाल!
Gang, robbers, Kharghar,
खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय
herbal paan masala safe to quit tobacco gutkha addiction
हर्बल पान मसाला तंबाखू, गुटख्याचे व्यसन सोडण्यासाठी सुरक्षित आहे का? तज्ज्ञ काय सांगतात
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
drugs, shop, sell drugs,
इथे दुकान मांडून चक्क अमली पदार्थ विकतात…
The couple did this to get a free meal at an expensive restaurant netizens
हद्द झाली राव! महागड्या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळवण्यासाठी जोडप्याने केले हे कृत्य, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
Jugaad Video how to Paint plants Pots in just five minuts
Jugaad Video : पाच मिनिटांमध्ये अशा रंगवा घरच्या बागेतील कुंड्या, पाहा भन्नाट जुगाड

अशा प्रकारे करा वापर

कोणत्याही प्रकारचे दोन वेट वाइप्स घ्या आणि कपड्यांसह वॉशिंग मशीनच्या टबमध्ये ठेवा. आता सामान्य मोडवर वॉशिंग मशीन चालू करा. असे केल्याने कपड्यांवर अडकलेले लिंट आणि केस सहज स्वच्छ होतील आणि कपड्यांना नवीन चमक मिळेल.

घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर, जॅकेट किंवा मखमली कपडे इत्यादी धूत असाल तर ही युक्ती त्यांच्यावर सहज कार्य करेल. जर तुम्ही एकाच वेळी जास्त कपडे धूत असाल तर दोनपेक्षा जास्त वेट वाइप्स वापरणे फायदेशीर ठरेल.