मॅगी हा असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. मॅगी खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते, या भीतीपोटी काही लोक मॅगी खाणे टाळतात; तर काही लोक डाएट करतानासुद्धा मॅगी खात नाही. पण, खरंच डाएट करताना मॅगी खावी का? मॅगी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
सध्या इन्स्टाग्रामवर न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डाएट करताना मॅगी खावी का? याविषयी सांगितले आहे.

न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया सांगतात, “मॅगी हा आपल्या लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत आणि मित्रांबरोबर केलेल्या असंख्य पार्टीतला लोकप्रिय पदार्थ आहे. मॅगी इतका आवडता पदार्थ आहे की, हेल्दी अन्न खाणारे लोकसुद्धा मॅगीला नाही म्हणू शकत नाहीत. पण, डाएट करताना मॅगी खावी का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपण मॅगीमध्ये असणारे पोषक घटक जाणून घेऊ या.
मॅगीच्या एका प्लेटमध्ये २०५ कॅलरीज, ९.९ ग्रॅम प्रोटिन्स आणि १३१ कार्ब्स असतात. मॅगीमध्ये इतर स्नॅक्सच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्ही डाएट करतानासुद्धा मॅगी खाऊ शकता.”

why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : देवीच्या नावावरुन ठेवा तुमच्या मुलीचे हटके नाव, मुलींच्या नावांची लिस्ट एकदा पाहा..

त्या पुढे सांगतात, “मॅगी खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मॅगी हा लोकप्रिय पदार्थ आहे. चित्रपट बघताना तुम्ही मॅगीचा आस्वाद घेऊ शकता, पण चांगल्या आरोग्यासाठी हा एक पर्याय नाही.
यामध्ये व्हिटामिन्स, फायबर आणि मिनरल्स नसतात. मॅगी दीर्घकाळ टिकावी किंवा मॅगीची चव वाढवण्यासाठी यात केमिकलचा समावेश केला जाऊ शकतो. या मॅगीमध्ये फॅट्स, कार्ब्स आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. यामध्ये प्रोटिन्स आणि फायबर नसतात, त्यामुळे मॅगी खाल्ल्याने वजन कमी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्यातून फक्त एक किंवा दोन वेळा मॅगी खावी.”

सिमरत कथुरिया यांच्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांना प्रश्नसुद्धा विचारले आहेत. एका युजरने लिहिलेय, “डाएटमध्ये ओट्स मॅगी किंवी गव्हाच्या पिठाची मॅगी खाऊ शकतो का?”