Weight loss tips : ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे, त्यांनी व्यायाम, योगासने याशिवाय त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. चांगला आणि सकस आहार लवकर वजन कमी करण्यास मदत करतो. भात, बटाटे, साखर असे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते. अशा परिस्थितीत, लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन कमी करतात किंवा बंद करतात. केवळ काही पदार्थ न खाल्ल्याने फॅट बर्न होते असं नाही, तर त्यासाठी काही विशिष्ठ पदार्थांचा देखील आहारात समावेश केला पाहिजे. भारतातील बहुतेक घरांमध्ये नाश्त्यात पोहे खाल्ले जातात. पोहे भातापासूनच तयार केले जातात, पण भात वजन वाढवणारा मानला जात असला तरी पोहे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. तुम्हालाही पोहे खायला आवडत असतील तर त्याचे फायदे जाणून घ्या.

पोहे हा उत्तर भारतातील विशेषत: इंदूरमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. पोहे हे पौष्टिक अन्न आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आहारतज्ञांच्या मते, पोहे खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात पोह्यांचा समावेश करावा.

The Union Public Service Commission CAPF registration begins apply for 506 Assistant Commandant posts
UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार

पोहे खाण्याचे फायदे

पोहे वजन कमी करण्यास मदत करतात कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. याशिवाय पोहे लोह, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे. पोहे खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेले राहते. पोहे पचनक्रियाही बरोबर ठेवतात. ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे , त्यांनी पोहे खावेत. यामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि पोहे ग्लूटेन फ्री असल्याने पोटाच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो.

पोह्यामध्ये कमी कॅलरीज असतात . १०० ग्रॅम पोह्यांमध्ये १.९ मिलीग्राम व्हिटॅमिन सी, ६७.६ मिलीग्राम व्हिटॅमिन-ए, ६.१ मिलीग्राम लोह आणि ७९.७ मिलीग्राम फॉस्फरस आढळतात, जे वजन नियंत्रित करतात. पोहे बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्यामुळे तुम्ही पोह्यांच्या वेगवेगळ्या चवीचा आस्वाद घेऊ शकता. काही लोक गोड पोहे बनवतात, तर काहीजण भाज्या घालून अधिक पौष्टिक पोहे बनवतात.

पोहे खाण्याची वेळ आणि पद्धत

१. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने पोहे खात असाल, तर पोहे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. पोह्यांची एक चतुर्थांश प्लेट खाल्याने जास्त वेळ भूक लागत नाही.

२. पोहे फक्त नाश्त्यातच खावेत असे नाही, तर संध्याकाळच्या वेळीही वाटत असल्यास खाऊ शकतो.

३. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही पोहे खाऊ शकता. पण शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून पोह्यांसह भाज्यांचा समावेश करा.