scorecardresearch

तज्ञांच्या मते त्वचा आणि शरीरासाठी कोणता साबण चांगला आहे? ते जाणून घ्या

ऑर्गेनिक साबण एक प्रकारे लघु उद्योगांना प्रोत्साहन देते. त्यामुळे ते प्रत्येकासाठी फायदेशीर आहे.

lifestyle
हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, जे मुरुम आणि एक्जिमाचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे. (Photo : Pixabay)

साबणाबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. लोकांचा असा विश्वास आहे की साबण तुमच्या शरीरातील त्वचेची घाण साफ करते आणि तुम्हाला ताजेतवाने करतात. पण खरचं अस आहे का? तर यावेळी सतलिवाचे सह- संस्थापक आणि एक्सपर्ट नम्रता रेड्डी यांनी संगितले की साबण आपल्या शरीराच्या छिद्रांमध्ये येऊ शकतो. म्हणूनच आपण कोणत्या प्रकारचे साबण वापरत आहात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. विशेषत: जेव्हा बाजारात अनेक ब्रँडचे साबण उपलब्ध असतात.

तर यावेळी एक्सपर्ट नम्रता रेड्डी यांनी बाजारात विकल्या जाणाऱ्या ऑर्गेनिक आणि सामान्य साबणांचा फरक सांगत त्यांनी ऑर्गेनिकआणि सामान्य साबणा या दोघांमध्ये खूप फरक असल्याचे संगितले आहे. नैसर्गिक उत्पादने आणि रसायने आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम करतात. या दोघांपैकी कोणते वापरावे आणि त्वचा-शरीरासाठी कोणते चांगले आहे हे जाणून घेऊयात.

ऑर्गेनिक साबणातील मुख्य फरक

– ऑर्गेनिक साबण अधिक टिकाऊ आहे. यामध्ये रसायने, कीटकनाशके आणि कोणतेही केमिकल वापरली जात नाहीत. यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

– ऑर्गेनिक साबण त्वचेसाठी सुरक्षित आहे. खरं तर, सामान्य साबणात सल्फेट असते. ज्यामुळे साबण तयार होतो. यामुळे आपल्या त्वचेला याचा परिणाम होऊ शकतो.

– खरं तर, त्वचा स्वच्छ करण्यासाठी, खोलवर जाण्यासाठी आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक तेलांची आवश्यकता असते. यासाठी ऑर्गेनिक साबण त्वचा स्वच्छ करण्यासाठी परिपूर्ण आहेत. बहुतेक ऑर्गेनिक साबणांमध्ये नारळ, जोजोबा आणि भांग बिया असतात. या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेली घाण साफ करण्याची आणि त्वचा आतून स्वच्छ करण्याची क्षमता असते.

– ऑर्गेनिक साबण तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे साबण विविध प्रकारच्या नैसर्गिक तेलांपासून बनवले जातात.ज्यात लाई आणि हायड्रोलिसिस असतात. हे सर्व नैसर्गिकरित्या परिपूर्ण आहेत. त्याचे अनेक फायदे आहेत जसे की त्यात मॉइस्चरायझिंग आणि त्वचा साफ करणारे गुणधर्म आहेत.

– तसेच ते हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, जे मुरुम आणि एक्जिमाचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे. ऑर्गेनिक साबण एक प्रकारे लघु उद्योगांना प्रोत्साहन देते. त्यामुळे ते प्रत्येकासाठी फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 17:14 IST