Eating Eggs Benefits: अंडी वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग मानला जातो. कारण अंड्यात भरपूर व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. परंतु, तुम्ही ही अंडी कशा पद्धतीने खाता यावर सर्व अवलंबून आहे. अमेरिकन केमिकल सोसायटी जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल ॲण्ड फूड केमिस्ट्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी कोणती अंडी अधिक फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आहे. वजन कमी करण्यासाठी उकडलेली अंडी की ऑम्लेट खाणं फायदेशीर आहे?
संशोधन काय सांगतं?
अमेरिकन केमिकल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात अंडी शिजवण्याच्या विविध पद्धती सांगण्यात आल्या आहेत. अंडं उकडले जाते तेव्हा त्यात कोणतेही तेल वापरले जात नाही, ज्यामुळे त्यात जास्त कॅलरीज नसतात. परंतु, जेव्हा ऑम्लेट तेल किंवा बटर वापरून बनवले जातात तेव्हा त्यात जास्त कॅलरीज असतात. काही लोक त्यांच्या ऑम्लेटमध्ये प्रक्रिया केलेले मांसदेखील घालतात, त्यामुळे त्यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण वाढते.
काय खाणं अधिक फायदेशीर?
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, उकडलेली अंडी वजन कमी करण्यास अधिक उपयुक्त ठरू शकतात. तर ऑम्लेट शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढवू शकतात. उकडलेल्या अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने जास्त असतात. ते जास्त काळ पोट भरलेले ठेवतात, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. उकडलेल्या अंड्यात तेल किंवा बटर वापरत नाहीत, त्यामुळे जास्त कॅलरीज शरीरात जात नाहीत. वर्कआउटनंतर रिकव्हरी व्हायला आणि लवकर पचायला ते सोपे असते.
