स्त्री आणि पुरुषांमध्ये जीन्स खूप लोकप्रिय आहे. जीन्स घालून फॅशन करणं आता तरुणांचा जीवनाचा भाग बनला आहे. जीन्स घालणं तरुणींना जास्त कंफर्टेबल वाटतं. मात्र असं असलं तरी स्त्री आणि पुरुषांच्या जीन्समध्ये बराच फरक असतो. बऱ्याचदा यामागचं खरं कारण माहिती नसतं. पुरुषांच्या जीन्स पॉकेटच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पॉकेटचा आकार कमी असतो. त्यामुळे खिशात मोठा मोबाईल किंवा इतर वस्तू ठेवणं कठीण होतं. मात्र यामागचं कारण एका फॅशन डिझायनरने समोर आणलं आहे. गेल्या १० वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रित काम करण्याऱ्या एमिली केलरने यामागची तीन कारणं सांगितली आहेत.

कॉस्ट कटिंग: महिलांच्या जीन्सचे खिसे पुरुषांच्या जीन्सच्या खिशांपेक्षा लहान असण्याचे मुख्य कारण म्हणजे किमतीत कपात असल्याचे सांगितले जाते. १० वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीचा एक भाग असलेल्या फॅशन डिझायनर एमिली केलर यांनी सांगितले की, महिलांच्या जीन्सचे खिसे लहान असतात त्यामुळे कपड्यावर खर्च कमी करता येतो. याशिवाय बहुतेक कंपन्या महिलांच्या जीन्स लहान ठेवण्याचा विचार करतात. कारण त्यामुळे कपड्यांची बचत होते. जेणेकरून त्याचा कंपनीला फायदा होऊ शकेल. लहान पॉकेट्स बनवून कंपन्यांना खूप फायदा होतो.

This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पॉकेट एरिया स्ट्रेच होण्याची भीती: महिलांच्या जीन्स पॉकेटचा आकार वाढवला तर तो भाग स्ट्रेच होईल. त्यामुळे पॉकेट छोटे ठेवले जातात. फॅशन डिझायनर एमिली केलर यांनी पुन्हा एकदा कॉस्ट कटिंगचा मुद्दा उपस्थित केला.

फॅशन ट्रेंड: फॅशन ट्रेंडमुळे महिलांच्या जीन्सचे खिसे लहान ठेवले जातात. सध्या बाजारात खिसे नसलेल्या जीन्सचा ट्रेंडही आला आहे. त्यामुळे या मागे फॅशन ट्रेंड हे देखील प्रमुख कारण आहे.