दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण आणि खरेदीची लयलूट. हीच गोष्ट लक्षात घेऊन शाओमी कंपनीने नुकताच आपला सेल जाहीर केला आहे. मूळ चीनची असणाऱ्या या कंपनीने भारतात कमी काळात पसंती मिळवली. त्याचाच फायदा घेऊन कंपनी आपले सेल जाहीर करते. आता दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने आपला हा धमाकेदार सेल लाँच केला असून तो २३ ऑक्टोबरला ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सुरु राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन्स, पॉवर बँक आणि इतरही काही उपकरणांवर सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला यातील कोणत्याही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ही अतिशय उत्तम संधी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ग्राहकांना mi.com वर ही खरेदी करता येईल.

१. Xiaomi Redmi Note 5 pro या फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेला फोन १२,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेजचा फोन १४,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर Redmi Y2 हा फोन १०,९९९ रुपयांना मिळेल. Mi A2 फोनच्या किमतीतही २ हजार रुपयांची सूट देण्यात आल्याने हा फोन १४,९९९ रुपयांना मिळणार आहे.

२. याबरोबरच काही गेम्सही मिळणार आहेत. यामध्ये Cracker Ninja चा समावेश आहे. या गेममध्ये युजर्स स्क्रीनवर आलेल्या फटाक्यांना जाळू शकणार आहेत. जो सगळ्यात जास्त फटाके जाळेल त्याला Poco F1, Redmi Y2 आणि Mi पॉवर बँकशिवाय Mi कूपन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

३. स्वत: गेम खेळण्याबरोबरच आपल्या मित्रमंडळींना हे गेम खेळण्यासाठी आमंत्रण देऊन त्यांना शाओमीची उत्पादने जिंकण्यासाठी मदत करण्यात येईल.

४. यशिवाय More likes More Discounts या उपक्रमातही तुम्हाला सहभागी होता येणार आहे. यामध्ये तुम्ही जे उत्पादन लाईक कराल, त्याची किंमत कमी होणार आहे. ज्या उत्पादनाला जितके जास्त लाईक्स मिळतील, त्याची किंमत तितकी कमी होईल.

५. याशिवायही कंपनी अन्य काही ऑफर्स देणार आहे. तुम्ही ७५०० रुपयांची खरेदी केली आणि त्याचे पैसे एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरल्यास एसबीआयकडून त्यावर थेट ७५० रुपये सूट मिळणार आहे.

६. Redmi Note 5 Pro आणि Poco F1 च्या खरेदीवर पेटीएमने पेमेंट केल्यास ५०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.

७. २ हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्यास मोबीक्विकवर २० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.