News Flash

आयुर्मात्रा : बेल

औषधांमध्ये बेलफळ वापरतात. कच्चे व पूर्ण पिकलेले बेलफळ यांचा औषधांत उपयोग करतात.

* औषधांमध्ये बेलफळ वापरतात. कच्चे व पूर्ण पिकलेले बेलफळ यांचा औषधांत उपयोग करतात. कच्च्या फळाचा गर जुलाब थांबवण्यासाठी तर पक्क्या फळाचा उपयोग शौचाला साफ होण्यासाठी करतात. कच्च्या फळाचा गर वाळवून त्याचे चूर्णरूपात किंवा काढा किंवा तो वाफवून त्याचा मुरांबा करून तो औषधासाठी वापरतात.

* वारंवार शौचास होणे, जुलाब होणे, आंव-रक्त पडणे, पोटात मुरडून वारंवार थोडे थोडे शौचास होणे, मळ चिकट असणे या सर्व विकारांवर बेलफळाच्या गरापासून (मगज) तयार केलेली  ‘विल्वादि चूर्ण’, ‘बेलफळाचा मुरांबा’ अशी औषधे खूप उपयोगी पडतात.

* पूर्ण पिकलेल्या बेलफळाच्या गराचा काढा किंवा सरबत शौचास साफ होण्यासाठी उपयोगी पडते.

* बेलाची पाने थोडी तुरट व कडू असल्याने मधुमेहात साखर कमी करण्यासाठी चावून खावीत. त्याने थोडी ताकद वाढते आणि कडकीही कमी होते. एकंदरीतच प्रकृती निरोगी व उत्तम राहण्यासाठी दोन बेलाची पाने (त्रिदल) पाच तुळशीची पाने व पाच कडुनिंबाची पाने सर्वानी सकाळी नाश्त्यापूर्वी चावून खावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 5:22 am

Web Title: aegle marmelos
Next Stories
1 #WorldHeartDay | बालहृदयरोग!
2 दातांच्या मुळापर्यंत उपचार रूट कॅनल!
3 उदरभरण नोहे.! : चणे-शेंगदाणे!
Just Now!
X