|| डॉ. योगेश्वर नंदनवार, स्त्रीरोगतज्ज्ञ.

लहान वयापासूनच मुलांना आंघोळ घालताना लैंगिक अवयव कोणते आहेत आणि त्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याबाबतचा संवाद पालकांनी मुलांशी साधणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या पौंगडावस्थेमध्ये लैंगिक अवयवांमध्ये होणारे बदल, त्यामागची कारणे आणि हे बदल स्वीकारण्याची मुलांची मानसिक तयारी करून घेण्याची जबाबदारी पालकांनी उत्तमपणे निभावली की मुलांच्या मनामध्ये शंकाकुशंकांचा गुंता वाढत नाही. त्यानंतर येणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तारुण्य. लैंगिक अवयवयांचे आजार आणि त्यांच्या अडचणी या साधारणपणे तारुण्य आणि वैवाहिक आयुष्य या टप्प्यांदरम्यान उद्भवतात.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार लैंगिक संबंधांद्वारे होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे जे सांसर्गिक आजार होतात. त्यांना लैंगिक आजार म्हणतात. वेगवेगळे जिवाणू किंवा विषाणूंमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात.

स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या आजाराची लक्षणे

  • योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव येणे किंवा पांढरे पाणी जाणे किंवा दह्यासारखा पांढरा द्रव जाणे.
  • लघवी करताना जळजळ होणे.
  • योनीमध्ये खाज येणे.
  • योनीमार्गात लालसर फोड किंवा पुरळ येणे.
  • तोंडामध्ये फोड, जखमा, जळजळ किंवा त्वचा लालसर होणे.

पुरुषांमध्ये उद्भवणाऱ्या आजारांची लक्षणे.

  • लिंगावर पुरळ व फोड येणे.
  • लिंगातून पिवळसर स्राव किंवा पू येणे.
  • लिंगाला खाज येणे.
  • लघवी करताना जळजळ होणे.
  • तोंडामध्ये फोड, जखमा, जळजळ किंवा त्वचा लालसर होणे.

अवयवांची स्वच्छता

योनी किंवा लिंगाची स्वच्छता करताना साबण लावण्याऐवजी स्वच्छ पाण्याने धुवावीत. साबण किंवा तत्सम रासायनिक द्रव्यांमध्ये अधिक प्रमाणात सोडा असल्याने लैंगिक अवयवांसाठी घातक ठरू शकतो किंवा त्या भागांमध्ये कोरडेपणा येऊ  शकतो. लैगिंक अवयवांच्या स्वच्छतेसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेली मलम, द्रावण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावीत.

  • मासिक पाळीच्या वेळेस दिवसातून किमान तीन वेळा नॅपकिन बदलावेत. स्वच्छ कपडा वापरणेही आरोग्यासाठी हितकारक असते.
  • लैंगिक संबंधांच्या वेळेस संसर्ग होऊ नये यासाठी नेहमी निरोधचा वापर करणे.
  • एकापेक्षा जास्त व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला तसेच लैंगिक आजार असलेल्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला रोगाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो.

हे करू नये

  • पेट्रोल, सोडा, लिंबू वापरून लैंगिक आजार बरे होतात, असा गैरसमज आहे. तेव्हा याचा वापर कदापि करू नये. याच्या वापराने आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
  • या आजारांमध्ये हकीम किंवा भगत यांच्याकडे उपचार घेण्यास जाऊ नये.

हे अवश्य करा

  • वरीलपैकी लैगिंक अवयवांच्या कोणत्याही तक्रारीसाठी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
  • औषधांच्या दुकानांमध्ये जाऊन परस्पर औषधे घेऊ नयेत. काही आजारांची लक्षणे सारखी असली तरी त्यासाठीची औषधे वेगवेगळी असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लय़ानेच औषधे घ्यावीत.
  • बाहेरील लक्षणे पूर्णपणे बरी झाली असली तरी डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या कालावधीपर्यंत औषधे घ्यावीत. औषधे संपल्यानंतर आजार बरा झाला आहे का याची खात्री डॉक्टरांकडून करून घ्या.
  • लैंगिक अवयवांच्या आजाराबाबत भीती किंवा लाज न बाळगता समुपदेशक किंवा डॉक्टरांशी खुलेपणाने चर्चा करा.

वेळेवर उपचार न केल्यास काय होऊ  शकते?

  • लैंगिक आजार झालेला असल्यास एचआयव्हीची बाधा होण्याची शक्यता ५ ते २० टक्कय़ांनी जास्त असते.
  • वंध्यत्व येऊ शकते.
  • गरोदर स्त्रीला लैंगिक आजार असल्यास बाळासही आजार होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार न केल्यास बाळाला अपंगत्वही येऊ शकते.
  • वारंवार अशा संसर्गामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

लैगिंक आजार आणि त्यांची लक्षणे

परमा (गोन्होरिया) – पुरुषांमध्ये लिंगामधून दुर्गंधीयुक्त स्राव किंवा पू येणे, स्त्रियांमध्ये योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव येणे, लघवी करताना जळजळ व दुर्गंधीयुक्त स्राव येणे.

ट्रयाकोमोनस व्हजायनाटीस- स्त्रियांच्या योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव येणे, अनियमित मासिक स्राव, योनीला खाज येणे. स्त्रियांना लैंगिक संबंधांच्या वेळेस दुखणे.

गरमी (सिफिलिस) – पुरुषांमध्ये लिंगावर, अंडकोषावर किंवा गुदद्वारावर जखम किंवा पुरळ, फोड येणे, स्त्रियांमध्ये योनीमध्ये किंवा योनीवर गुदद्वारावर जखम होणे, लिंगावर किंवा आजूबाजूला सतत सूज येणे.

मृदवण- स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखणे, योनीमध्ये किंवा योनीवर गाठ, पुरळ किंवा फोड येणे, पुरुषांमध्ये लिंगावर जखमा होणे, लिंगाला सूज येणे.

कोंडीलोमा लॅटा – गुदद्वारामध्ये जखम होणे, भेगा पडणे, लालसर होणे, रक्त येणे, खाज येणे, चट्टे येणे.

ल्युकोप्लाकिया – तोंडामध्ये डाग पडणे, जखमा होणे, भेगा पडणे, लालसर होणे.

मोनालियासीस – स्त्रियांच्या योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव येणे, अनियमित मासिक स्राव, योनीला खाज येणे. स्त्रियांना लैंगिक संबंधावेळेस दुखणे.