News Flash

दुचाकीवरून :   सायकल गॅजेट्स

सायकलिंग करताना कायनेटिक ऊर्जा निर्माण करण्यासाठीचे उपकरणही बाजारात आले आहे.

सायकलींसाठी अनेक गॅजेट्स बाजारात आली आहेत. सायकलच्या उपयुक्त अ‍ॅक्सेसरीजबद्दल माहिती आपण याआधीच घेतली. गेल्या लेखामध्ये निवडक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल माहिती जाणून घेतली होती. या लेखात उर्वरित  इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल माहिती घेऊ.

बाइक कॉम्प्युटर: वेग, अंतर, चढउतार, दिशादर्शक, जीपीएस, मॅप अशा अनेक गोष्टी बाइक कॉम्प्युटरमध्ये एकत्रित असतात. तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाइलशीही ते सहज जोडता येतात. वेगवेगळ्या आकारात, प्रकारात आणि मोठी स्क्रीन असणारे, सर्व डेटा एकत्रित स्क्रीनवर दाखवणारे कॉम्प्युटर उपलब्ध आहेत.

जीपीएस: आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळवण्यासाठी ग्लोबल पोझिशिनग सिस्टीम (जीपीएस) अतिशय उपयुक्त डिव्हाइस आहे. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटणाद्वारे मिळू शकते.

स्पीकर्स : लांब पल्ल्याचे सायकिलग करताना काही तरी मनोरंजन लागते. त्यासाठी अनेक जण हेडफोन लावून गाणी ऐकतात; परंतु त्यामुळे इतर आवाजांपासून आपण तुटतो. आता पोर्टेबल स्पीकर्स बाजारात आले आहेत. ब्लूटूथद्वारे जोडता येणारे हे स्पीकर्स सायकलवर बसवले की गाण्यांसोबत आपण इतरही आवाज ऐकू शकतो.

सायकल अ‍ॅटम : सायकलिंग करताना कायनेटिक ऊर्जा निर्माण करण्यासाठीचे उपकरणही बाजारात आले आहे. हे डिव्हाइस तुम्ही सायकलच्या अ‍ॅक्सलला लावल्याने त्यातून निर्माण होणारी ऊर्जा यूएसबीचा वापर करून इतर इलेक्टॉनिक डिव्हाइस चार्ज करण्यासाठी वापरू शकता.

लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.

प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 5:10 am

Web Title: cycle gadgets 2
Next Stories
1 व्हिएतनामची  सापा व्हॅली 
2 सेंट मेरीज आयलॅण्ड
3 आडवाटेवरची वारसास्थळे  : पेमगिरीची वटराई
Just Now!
X