News Flash

धारकुंड

अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही शांत-निसर्गरम्य ठिकाणेसुद्धा पाहायला मिळतात. धारकुंड

धारकुंड

अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही शांत-निसर्गरम्य ठिकाणेसुद्धा पाहायला मिळतात. धारकुंड हे त्यातलेच एक. चाळीसगाववरून बनोटीमाग्रे इथे जाता येते. बनोटीपर्यंत चांगला रस्ता आहे. बनोटीला असलेले एक प्राचीन शिवमंदिर पाहण्याजोगे आहे. बनोटीपासून पुढे काहीसा कच्चा रस्ता असून काही अंतर मात्र चालत जावे लागते. अर्धा ते पाऊण तास चालले की समोर एक मोठा धबधबा दिसू लागतो. वाटेत आधी एक तलाव लागतो, त्याच्या काठाकाठाने डोंगराच्या अगदी पोटात जावे लागते. अंदाजे २०० फुटांवरून आता आपल्यासमोर धबधबा कोसळत असतो. खूप मोठय़ा प्रमाणावर आणि खूप उंचीवरून पडणारे पाणी खाली तयार झालेल्या एका मोठय़ा डोहात जमा होते. आजूबाजूला सर्वत्र या पाण्याचे तुषार उडत असतात. जर जोराचा वारा आला तर हे खाली पडणारे पाणी अधूनमधून वरच्या दिशेलाही उडते. आजूबाजूचा सारा परिसर हिरवागार झालेला असतो आणि त्यात मधोमध हा अव्याहत कोसळणारा जलप्रपात सारे वातावरण गूढरम्य करून टाकतो. या ठिकाणी डोंगराच्या पोटात एक मोठ्ठी घळ तयार झालेली आहे. त्या घळीत शंकराची एक िपड आहे. त्याच्यासमोरच नंदीची प्रतिमा दिसते. त्या घळीची लांबी अंदाजे ३०० फूट असून, खोली जवळजवळ ३० ते ४० फूट इतकी भरते. घळीला काही नसगक भिंती असून, त्यामुळे विविध कप्पे तयार झालेले आहेत. बाहेर खूप उंचावरून मोठा आवाज करत कोसळणारा धबधबा आणि त्यासमोर तयार झालेले मोठे कुंड हे या घळीतून पाहण्याची मजा औरच.

या ठिकाणी येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कन्नड या तालुक्याच्या गावावरून घाटशेंद्रा या गावी जायचे. घाटशेंद्रावरून तळनेर या गावी आपले वाहन

ठेवायचे आणि डोंगराच्या काठापर्यंत चालत जायचे. इथे एक शिवमंदिर दृष्टीस पडते. जुन्या पडलेल्या मंदिराचे अवशेष या ठिकाणी वापरलेले दिसतात. इथून डोंगर उतरून आपण धारकुंडला जाऊ शकतो, परंतु तळनेर गावातून कोणी वाटाडय़ा घेऊन जावा. डोंगरावरून खाली काहीसे जपून उतरावे लागते, पण इथे आपण धारकुंडला वरून खाली जात असल्यामुळे एक वेगळाच निसर्ग अनुभवता येतो. धारकुंडचा धबधबा खरोखर प्रेक्षणीय आहे. निसर्गसान्निध्यात वसलेले हे ठिकाण मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.

आवाहन

लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.

  • ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलीकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
  • भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.
  • आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

 

ई-मेल – lokbhramanti@gmail.com

 

– आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 12:46 am

Web Title: dharkund tours
Next Stories
1 दुचाकीवरून : सायकल टुरिंगचे दस्तावेजीकरण
2 त्रिपुरा
3 प्रांतोप्रांतीचे गणपती
Just Now!
X