आपल्या स्टाफचे विविध प्रकारे कौतुक करणे हे व्यवस्थापनाला नीट जमले पाहिजे. चारचौघांमध्ये कौतुक झाल्याने कर्मचाऱ्याला जो आनंद होतो तो वर्णनापलीकडे असतो. त्यामुळेच आजकाल बऱ्याच कंपन्या एखाद्या कर्मचाऱ्याचे कौतुक, जाहीर सोहळा म्हणून साजरा करतात.

एक संशोधन असे दर्शविते की ५० टक्के स्टाफ आपल्या कामाचे कौतुक नीट झाले तर नोकरी बदलायचा विचार सोडून देतो. ४० टक्के स्टाफ आपले कौतुक नीट झाले नाही तर फक्त पाटय़ा टाकण्याचे काम करतो. अधिक कामे करावीत, स्वत:हून पुढाकार घेऊन नवीन कल्पना राबवाव्यात यापासून नाराज स्टाफ दूरच राहणे पसंत करतो.

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
ban on meat sale caste system marathi news
मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!
corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

सारांश लोकांचे दिलखुलास कौतुक करणे कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे. ग्रोपॉन (Groupon) कंपनीमध्ये कोणीही नोकरीचे वर्ष पूर्ण केले की वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी प्रमाणेच वर्क अ‍ॅनिव्हर्सरी साजरी केली जाते. जितकी वर्षे नोकरी झाली तितके स्टार्स एका खास जॅकेटवर मिरविण्याचे भाग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येते.

इन्फ्लूएन्स अ‍ॅण्ड कंपनी  (Influence & Co) मध्ये ज्या कर्मचाऱ्याने अभिनव कल्पना सुचविली असेल किंवा प्रत्यक्षात अमलात आणली असेल त्याला विशिष्ट प्रकारचा बेल्ट देण्यात येतो. त्यामुळे  पूर्ण कंपनीमध्ये तो उत्सवमूर्ती म्हणून ओळखला जातो.

झाप्पोस (Zapposl) कंपनीमध्ये वैयक्तिक कामगिरीसोबत टीम वर्क गौरविण्यासाठी आपल्या टीमसाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्या, दुसऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामामध्ये लक्षणीय मदत करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचे सहकारी ५० डॉलर्स, अधिकचा इन्सेन्टिव्ह रेकमेंड करू शकतात.

रेड वेल्वेट इव्हेंट्स (Red Velvet Events) कंपनीमध्ये उत्तम वैयक्तिक किंवा सांघिक कामगिरी बजाविलेल्यांना एक सुंदर बाहुली भेट दिली जाते. त्या कामगिरीचे प्रतीक म्हणून त्या बाहुलीला एखादा सुंदर साज चढविला जातो. एखादे ब्रेसलेट, एखादी ईयर रिंग वगैरे वगैरे. ही बाहुली फिरती ढाल असते. त्यामुळे उत्तरोत्तर ती बाहुली खूपच मोहक होत जाते व पुढच्या माणसाचे कौतुक करताना जुन्या माणसाच्या कर्तबगारीचीदेखील नकळत आठवण काढली जाते.

कौतुक नेमके कशासाठी केले आहे हेदेखील नेमके समजावे यासाठी पुरस्काराचे नावदेखील समर्पक हवे. टाटा कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी मोजूनमापून जोखीम घेऊन नवीन वाट शोधावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ‘डेअर टु ट्राय’ हा पुरस्कार देऊन अशा धाडसी लोकांचे जाहीर कौतुक टाटामध्ये केले जाते.

उत्पादनखर्चात किंवा जाहिरात खर्चात किंवा अजून दुसऱ्या कोणत्या प्रकारे बचत करणाऱ्या कर्मचाऱ्याला लीन अ‍ॅण्ड मीन (Lean and Mean) हा पुरस्कार दिला जातो.

माय बॉस िथक्स आय अ‍ॅम काईन्ड ऑफ अ बिग डील (My Boss Thinks Ilm Kind of a Big Deal) असे बिरुद मिरविणारा बोर्ड कर्मचाऱ्याच्या डेस्क वर असेल तर ऑफिसमध्ये त्याची कॉलर ताठ राहणारच! आपण आपल्या वरिष्ठांसाठी व पर्यायाने कंपनीसाठी किती महत्त्वाचे (अ‍ॅसेट) आहोत हे जगजाहीर झाले की डोंगराएवढे कठीण काम उपसायलादेखील हुरूप येतो. असे म्हणतात की कर्मचारी, कंपनीला वैतागून नोकरी सोडून जात नाहीत तर वरिष्ठांना कंटाळून नोकरी सोडून जातात. पण इथे बॉसच जर आपल्या प्रेमात पडला असेल तर कोण कशाला दुसरी नोकरी बघेल?

कर्मचाऱ्याला काय भेट द्यावी यामध्ये कल्पकता वापरल्यास कर्मचाऱ्याचा आनंद द्विगुणीत होतो. कर्मचाऱ्याला गोल्फ खेळायला आवडत असेल तर त्याची कामातील हुशारी गौरविण्यासाठी गोल्फ स्टिक भेट द्यावी. गिटार वाजवायला आवडत असेल तर त्याला ती भेट द्यावी.

आजकाल कंपनीमध्ये कार पार्किंग मिळणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये ते मिळाले व तेदेखील मनपसंत ठिकाणी तर क्या बात है! कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचे कौतुक असे आगळ्यावेगळ्या प्रकारे झालेले पाहायला मिळाले तर स्वर्ग दोन बोटे उरतो.

ऑफिसमध्ये ‘प्लम असाइनमेंट’ म्हणजेच ‘मनाजोगती असाइनमेंट’ मिळावी अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची सुप्त इच्छा असते. एखाद्या कर्मचाऱ्याने सध्याच्या प्रोजेक्टमध्ये नेत्रदीपक कामगिरी पार पडली असेल तर त्याच्या चांगल्या कामाचे फळ म्हणून त्याला भविष्यात त्याची ‘प्लम असाइनमेंट’ भेट म्हणून द्यावी.

ऑफिसमधील कौतुक घरच्या लोकांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले तर! त्यामुळेच कंपनीला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी केल्यावर, कामाच्या ठिकाणी आपल्या स्वकीयांना किंवा आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला आणण्याचे स्वातंत्र्य कर्मचाऱ्याला मिळाले तर दुग्धशर्करा योगच जुळून येतो.

आणि कौतुक एक सुखद धक्का म्हणून समोर आले तर! काही कंपन्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्याने हटके कामगिरी केली असेल त्याला त्याच्या कौतुक सोहळ्याची पुसटशीही कल्पना देण्यात येत नाही. त्या ऐवजी तो कर्मचारी घरी जाण्याची वाट बघण्यात येते व तो गेल्यावर त्याच्या डेस्कवर किंवा ड्रॉवरमध्ये त्याच्या आवडीचे गिफ्ट, खाणे ठेवण्यात येते ज्यायोगे दुसऱ्या दिवसाची त्याची सुरुवात स्वप्नवत होईल.

अत्यंत मोक्याच्या क्षणी माथे भडकू न देता, शांत चित्ताने संकटातून मार्ग काढणाऱ्या कर्मचाऱ्याला मिस्टर कूल म्हणून त्याच्या आवडीचे आईस्क्रीम देणे, विस्डम वॉल तयार करून, या मिस्टर कूलचे अनुभवाचे बोल (कोट्स) त्यावर लिहिणे अशा गोष्टींमुळेदेखील कर्मचाऱ्याचे मन जिंकता येते.

बाहेरील देशांमध्ये जिथे घरकामासाठी मनुष्यबळ नसते अशा ठिकाणी वीकेंडला स्वत:च्या घराची साफसफाई करणे एक कंटाळवाणे काम असते किंवा अंगणात साचलेला बर्फ हटविणे किंवा वाढलेले गावात छाटणे हा एक थकविणारा कार्यक्रम असतो. अशा वेळी जर कौतुकास्पद योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याला हाऊसकीपिंग एजन्सीचे कंत्राट भेट दिले तर त्याच्या घरच्यांचा दुवादेखील कंपनीला मिळतो.

कौतुक चारचौघांमध्ये व खरडपट्टी बंद दारामागे हे सूत्र जपले की कर्मचाऱ्यांना भावनिक बंधाने बांधून ठेवता येते हेच खरे !
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com