एका महाविद्यालयात एक सुंदर  प्रोफेसर सायन्स हा विषय शिकवायची. तिच्या क्लासमधील मुले मात्र खूप दंगेखोर होती. फळ्यावर लिहिण्यासाठी तिने वर्गाकडे पाठ करताच काही टवाळखोर मुले चक्क शिटय़ादेखील मारायची. आजच्या लेक्चरला देखील नेमके तसेच झाले.  प्रोफेसरने वळून ‘शिटी मारली त्याने उभे राहा’ अशी ऑर्डर सोडली. कोणीही उभे राहिले नाही व इतरांनी कोणाचे नाव सांगण्यास नकार दिला. प्रोफेसर शिटी मारणाऱ्याला पकडू शकत नाहीत या विचाराने सर्व क्लास तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसू लागला. प्रोफेसरने मात्र न रागावता आज मी खूप खूश असल्याने तुमच्यावर न रागावता क्लास सोडून जात आहे असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्लासला हे अनपेक्षित होते, मुलांनी प्रोफेसरला त्यांच्या खुशीचे कारण विचारण्याचे ठरविले. प्रोफेसर म्हणाली, ‘‘काल मी रात्री उशिरा पार्टीवरून घरी परतत होते. मला रिक्षा किंवा टॅक्सी मिळत नव्हती. अशा वेळी एक देखणा तरुण पोर्शे कारमधून जात असताना माझ्यापाशी थांबला व त्याने मला लिफ्ट देऊ  केली. कारमध्ये बसल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या व आम्ही दोघे प्रथमदर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या कॉलेजबद्दल कळल्यावर तो देखणा तरुण सहज म्हणाला, अरे माझा धाकटा भाऊ पण तुमच्याच वर्गात शिकतो. मी त्याला विचारले, त्याला मी कसा ओळखू? त्यावर तो तरुण हसत म्हणाला, जो मोठय़ाने व वेगवेगळ्या शिटय़ा मारू शकतो तोच माझा भाऊ.’’

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporate story by prashant dandekar
First published on: 02-12-2016 at 01:12 IST