को हं? हा मानवाचा शोध एक आदिम ध्यास आहे. देहभावनेच्या पलीकडे जाऊन अमृतत्वाचा अनुभव घेण्याचा छंद मानवाने प्राचीन काळापासून जोपासला आहे आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. त्या देहातीततेच एकदा प्रचीती आली की शरीराचे येणे-जाणे म्हणजे केवळ जुने कपडे बदलून नवीन कपडे चढवल्यासारखेच वाटू लागते. भारतीय माणसाचा हा विचार भगवद्गीतेत ‘‘वासांसी जीर्णानि.’’ या श्लोकात अगदी स्पष्टपणे व्यक्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साने गुरुजींनी आपल्या ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथात या बीज कल्पनेला ‘मृत्यूचे महाकाव्य’ असे संबोधले आहे आणि अनेक वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे मृत्यूकडे पाहण्याचा भारतीय परंपरेतील सकारात्मक दृष्टिकोन उलगडून दाखवला आहे. मृत्यू म्हणजे नवीन प्रारंभासाठी आधीचे जुनाट आयुष्य संपवण्याचे निसर्गाने दिलेले वरदानच जणू!

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thalaikoothal
First published on: 29-04-2016 at 01:17 IST