साहित्य :
 42* ४ वाटय़ा भरून निवडलेल्या आवडीच्या कोवळ्या पालेभाज्या (पालक, माठ, चवळी, थोडासा पुदिना, अगदी थोडीशी अंबाडी किंवा चुका)
* २ चमचे बटर
* ६-७ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
* एकदम बारीक चिरून १ लहान कांदा,
* १/२ चमचा मिरची पेस्ट
* २ ते ३ चमचे क्रीम
* २ चिमटी दालचिनी पावडर
* चवीपुरते मीठ आणि मिरपूड
कृती :
१)     पालेभाज्या निवडून घ्याव्यात. मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. १/२ चमचा मीठ घालावे.
२)     पाणी उकळले की त्यात निवडलेल्या भाज्या घालाव्यात. २-४ मिनिटे उकळवावे. भाज्या चाळणीत काढून त्यावर गार पाणी घालावे. पाणी निथळून टाकावे. भाज्यांची प्युरी करावी.
३)     बटर कढईत गरम करून त्यावर लसूण परतावी. थोडी गुलाबी झाली की चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईस्तोवर परतावे. पालेभाज्यांची प्युरी घालावी. लागल्यास पाणी घालावे.
४)     चवीनुसार मीठ, मिरची पेस्ट घालावी. ५ मिनिटे मध्यम आचेवर उकळी काढावी. दालचिनी पावडर आणि मिरपूड घालून मिक्स करावे.
    सूप बोलमध्ये वाढावे. वरून क्रीम घालावे.
    सूप नुसते सव्‍‌र्ह न करता त्याबरोबर कुरकुरीत क्रॅकर्स किंवा क्रूटॉन्स द्यावे.
टिपा :
१) पालेभाज्या उकळवताना झाकण ठेवू नये, रंग काळपट येतो.
२) पालेभाज्या जर जून असतील तर प्युरी केल्यावर चाळणीवर गाळून घ्याव्यात.
३) मेथी, शेपू अशा कडवट किंवा उग्र पालेभाज्या टाळाव्यात. तसेच अंबाडी, आंबट चुका फक्त चवीपुरता वापरावा. जास्त वापरल्यास सूप आंबट होईल.

चीकपी पास्ता सूप
साहित्य :
45* १ वाटी शिजलेले काबुली चणे
* १/२ वाटी ड्राय पास्ता (शक्यतो आकाराने लहान)
* १ मध्यम टॉमेटो, प्युरी करून
* १ मध्यम गाजर, लहान तुकडे
* २ चमचे ऑलिव्ह ऑइल
* ४-५ लसणीच्या मोठय़ा पाकळ्या,
* बारीक चिरून
* १/२ चमचा रेड चिली फ्लेक्स
* १/२ चमचा इटालियन हब्र्ज ब्लेंड
* दीड ते दोन कप पाणी
* चवीपुरते मीठ

कृती :
१)    ऑलिव्ह ऑइल एका पातेल्यात गरम करावे. त्यात चिरलेला लसूण मध्यम आचेवर परतावा.
२)     नंतर गाजर घालून मिनिटभर परतावे. टोमॅटो प्युरी घालावी आणि मोठय़ा आचेवर मिनिटभर परतावे. आता पाणी, चणे आणि पास्ता घालावा.
३)     पास्ता शिजेस्तोवर उकळवावे. पास्ता शिजला की चिली फ्लेक्स, स्पाइस ब्लेंड आणि थोडे मीठ घालून ढवळावे.
    गरमागरम सूप सव्‍‌र्ह करावे.
टिपा :
१)    काबुली चणे व्यवस्थित शिजलेले असावेत.
२)    पास्ता शिजल्यावर लगेच सव्‍‌र्ह करावे. जर सूप आधीच बनवून ठेवायचे असल्यास पास्ता न घालता सूप बनवावे. जेव्हा सव्‍‌र्ह करायचे असेल तेव्हा पास्ता दुसऱ्या पातेल्यात शिजवून घ्यावा. गाळून घ्यावा. सूपमध्ये घालून मिनिटभर उकळी काढावी आणि मग सूप सव्‍‌र्ह करावे. (पास्ता जास्त वेळ सूपमध्ये राहिला तर तो फुगतो.)
३)    टोमॅटोला आंबटपणा नसेल तर थोडा लिंबाचा रस घालावा.

हब्र्ज क्रूटॉन्स
साहित्य :
44* ८ ते १० ब्रेड स्लाइस
* ३ मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल
* ५-६ लसणीच्या पाकळ्या, पेस्ट करून
* ड्राय मिक्स हर्ब्स (ओरेगानो, बेसिल इत्यादी) (पास्ता किंवा पिझ्झा स्पाइस ब्लेंड वापरावा)
* चवीनुसार रेड चिली फ्लेक्स
* चवीपुरते मीठ
कृती :
१)     शक्य असल्यास ब्रेडचे स्लाइस १/२ ते १ तास वाऱ्यावर ठेवून द्यावे किंवा उन्हात ठेवावे.
२)     ऑलिव्ह ऑइल, लसूण पेस्ट, मिक्स हब्र्ज आणि मीठ एकत्र करावे. ब्रेड स्लाइसच्या दोन्ही बाजूला थोडे ब्रशने लावून घ्यावे.
३)     तवा गरम करून आच मंद ठेवावी. दोन्ही बाजूंनी ब्रेड स्लाइस ब्राऊन आणि कुरकुरीत होईस्तोवर शेकून घ्यावे.
४)     ब्रेडचे लहान चौकोनी तुकडे करावे.
    हे क्रूटॉन्स सूपबरोबर सव्‍‌र्ह करता येतात.