आरोग्य विमा ही आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणूनच आरोग्य विम्याची खरेदी करताना काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सेलच्या जाहिराती बऱ्याचदा आपण वाचतो, उदाहरणार्थ एखादा फ्रिज अगर टीव्ही घ्यायचा झाला तर तो घरात येईपर्यंत घराची सध्याची गरज, वस्तूंचे दीर्घ मुदतीत फायदे किंवा घराच्या रंगसंगतीस साजेसे असणे इतका सूक्ष्म विचारही केला जातो. घराची शोभा वाढावी, नवीन तंत्रज्ञानाने जीवनातील वेळेचा, श्रमांचा अपव्यय टाळावा, अगदी शेजाऱ्यांकडे आहे म्हणूनही खरेदी करतो. कमीत कमी दोन-तीन तास ऊहापोह करून वेगवेगळ्या शंकांचे निरसन करून शेवटी कमीत कमी ३५ ते ५० हजारांची खरेदी केली जाते. वस्तू घरात आल्यावरही पंधरा ते वीस दिवस ती अपेक्षित आनंद, सोयी देते आहे का, त्याचे वॉरंटीकार्ड आहे का, ते जपून ठेवले का अशा तांत्रिक बाबींतही लक्ष घालतो. लेखिकेने ग्राहकांच्या मानसिकतेची केलेली निरीक्षणेही ‘आरोग्य विमा’ या विषयांशी असंबंध वाटतील. परंतु आजही भारतीय गुंतवणूकदार ‘आजीवन’ काही लाखांची सेवा  खरेदी करताना प्रत्येक वर्षी किमान दहा हजार किंमत मोजूनही घरातल्या टीव्ही, फ्रिज, एअरकन्डिशन तत्सम वस्तूंच्या खरेदी इतपतही गांभीर्याने अभ्यासपूर्वक करत नाही, ही खेदाची बाब आहे. आरोग्य विमा प्रत्येक कुटुंबाचा वैद्यकीय आणीबाणीत एकमेव आधार आहे. सुदैवाने केवळ आरोग्य विमा पॉलीसींचे वितरण करणाऱ्या सात कंपन्या भारतात उपलब्ध आहेत. परंतु कुटुंबाच्या समग्र आरोग्यविषयक संरक्षणाचे जाणीवपूर्वक नियोजन मात्र आजही कुटुंबप्रमुख करत नाही. आज प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे मोबाइल फोन आलेला आहे. चार मोबाइल धारकातील एक मोबाइल स्मार्टफोन आहे. या फोनमधील सर्च केलेले विषयही खरेदी, स्मार्टफोन, पर्यटन या विषयांतील जास्त नोंदले आहे. सारांश भारतीय गुंतवणूकदाराने आरोग्य विमाचे संरक्षण व्यक्तिगत आíथक नियोजन अपेक्षित गांभीर्याने, विचारपूर्वक निर्णय घेऊन करणे काळाची गरज आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health insurance
First published on: 23-06-2017 at 01:08 IST