कथा
‘एक होती चिमणी आणि एक होता कावळा.. एकदा काय झालं..’ आपल्या आयुष्यात चिऊ-काऊचा घास खाताना गोष्ट येते ती अशी. आणि मग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपली सोबत करत राहते. तुमच्याकडे आहे का अशी तुम्ही लिहिलेली नवीन कोरी गोष्ट? आमच्याकडे जरूर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लॉगर्स कट्टा
‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ या रामदासांच्या उक्तीचे तुम्ही समर्थक आहात? स्वत:चा ब्लॉग लिहिता? मग ‘लोकप्रभा’च्या ब्लॉगर्स कट्टय़ासाठी तुमचे लेखन पाठवा. विषयाची मर्यादा नाही.

ट्रेकर ब्लॉगर
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा, हिमालयातली पर्वतराजी, दऱ्याखोऱ्यांमधला भन्नाट वारा अंगावर घेत, निसर्गाचं आव्हान पेलायला तुम्हाला आवडतं? तुमच्या या अनुभवाला लिखाणाचं कोंदणही लाभलं आहे? मग तुम्हीच व्हा ‘लोकप्रभा’चे ट्रेकर ब्लॉगर. सोबत या ट्रेकिंगचे सुंदर फोटोही अवश्य पाठवावेत.

ट्रॅव्हलॉग
भटकंती करायला तुम्हाला आवडतं? देशात, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जायला, नवनवे अनुभव घ्यायला तुम्हाला आवडतं? मग तुमचे प्रवासाचे भन्नाट अनुभव ‘लोकप्रभा’बरोबरही शेअर करा.. भन्नाट भटकंती या सदरात. सोबत या भटकंतीचे सुंदर फोटोही अवश्य पाठवावेत.

रेसिपी पाठवा
उत्तमोत्तम आणि नवनवीन खाद्यपदार्थ खायला आणि करायला कुणाला आवडत नाही? किंबहुना खाणे आणि खिलवणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. अगदी पुराणकाळापासून ते आजपर्यंत आपल्याकडे खाद्यसंस्कृतीचे वर्णन आढळते. आपणदेखील आपल्या आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करत असतो. म्हणूनच तुमची वेगळी डिश जगासोबत शेअर करण्याची एक अनोखी संधी ‘लोकप्रभा’ उपलब्ध करुन देत आहे. चला तर मग तुमची आगळीवेगळी रेसिपी आम्हाला पाठवून द्या.. सोबत रेसिपीचा फोटोही पाठवायला विसरू नका.

नवनव्या दिशा, नवनवे विषय, नवनवे मार्ग तरुणाईला साद घालत असतात. तरुणांचं चैतन्यच जग बदलायला हातभार लावत असतं. आम्हाला प्रतीक्षा आहे अशा उत्स्फूर्त, उत्फुल्ल तरुणाईची. तरुणांच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, तरुणांचं लिखाण या सगळ्याचं ‘लोकप्रभा’ स्वागत करत आहे..
अट एकच. तुम्ही तरुण असायला हवे.
लेख पाठवताना सोबत कॉलेजच्या आयकार्डची झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपी सोबत जोडायला विसरू नका.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha appeal to readers
First published on: 18-12-2015 at 01:01 IST