सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, मोनास्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन, निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या लेह-लडाखची भटकंती एकदा तरी अनुभवावी अशीच आहे.

लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपकी एक आहे. या प्रदेशातील प्रवास वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक असतो असे ऐकले होते. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात तो अनुभव घेतो तेव्हा त्यातील रोमांच कळून येतो. जम्मूहून आपण निसर्गसौंदर्याने नटलेल्या पटणीटॉपहून श्रीनगरला येतो. जम्मू-काश्मीर हायवेवरचा प्रवास म्हणजे नंदनवन काय असतं याचा अनुभव देऊन जातो. नजर जाईल तिथे विपुल सृष्टीसौंदर्य.

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!

श्रीनगरहून कारगिलला जाताना आपली भारतीय सेना किती खडतर परिस्थितीत कार्यरत असते हे पाहून अभिमान वाटतो. कारगिलच्या दक्षिणेला काश्मीर खोरे तर पश्चिमेला गिलगिट बाल्टिस्तान आहे. त्यामुळे लष्करीदृष्टय़ा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. लेहला जाण्यापूर्वी कारगिलला मुक्काम करता येतो. द्रासचे युद्धस्मारक पाहताना धन्य वाटते. द्रास हे आशिया खंडातील सर्वात थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. द्रासचे खोरे हे लडाखचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. येथील अतिशय थंड हवामानामुळे स्वेटर, ग्लोव्हज, जॅकेट्स अशी तयारी करावी लागते.

द्रासहून केव्हा एकदा आपण लेहला जाऊ याची उत्सुकता लागून राहिलेली असते. लेह हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. येथील अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून जाते. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, पारदर्शी निळे पाणी, तलाव, सरोवर, खोल दऱ्या असा नजारा पाहताना एका वेगळ्याच विश्वात जायला होते.

घाईगर्दीच्या शहरी जीवनात येणारा ताण लेह-लडाखचा निसर्ग पाहून निघून जातो. या भूमीवर एका विलक्षण शांतीचा अनुभव येतो. बौद्ध धर्माच्या पगडय़ामुळे या प्रदेशाला आध्यात्मिक पाश्र्वभूमीही आहे. रायसी फोर्ट, रॉयल पॅलेस, प्यांग, लिकिर, स्पिटुक, थिक्से अशा मॉनेस्ट्रीज (मठ) येथे आहेत. हे प्राचीन बौद्ध मठ पाहताना एका गूढ विश्वात आपण जातो.

लेह-लडाखमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. लेहमधील पँगाँग सरोवर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. लडाखहून हे सरोवर १६० कि.मी. अंतरावर आहे. अत्यंत पारदर्शी, नितळ पाणी आणि लुभावणारे निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. संपूर्ण वर्षभर येथे छान हवामान असते. काळ्या मानेचे सबेरियन क्रेन येथे दिसतात. या दुर्मीळ पक्ष्यांची प्रजोत्पादनाची ही जागा आहे असे सांगितले जाते.

लेहपासून सात तासांच्या अंतरावर त्समोरिरी सरोवर आहे. मात्र या सरोवराकडे जाणारा मार्ग दुर्गम असून अलिप्त अशा रूपशु खोऱ्यामधून तो जातो. खडतर प्रवासानंतर हे सरोवर पाहिल्यावर डोळे निवतात. लेहपासून १२५ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध लामायुरू ट्रेक आहे. पर्वतमय भागातून प्रवास करावा लागतो आणि बर्फाच्छादित शिखरांचे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळते. लेहमधील चुंबकीय क्षेत्र हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण. येथे चुंबकीय परिणाम अनुभवायला मिळतात. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे.

लेह येथून बर्फाचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुब्रा व्हॅलीकडे तुमचा प्रवास सुरू होतो. नुब्रा खोऱ्यातून नुब्रा नदी वाहते. तेथील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पाहण्यासारखे ठिकाण आहे. विविधरंगी फुलांची उधळण पाहायला मिळते. नुब्रा खोऱ्यामध्ये सर्वात प्राचीन आणि मोठी गुंफा आहे. ‘डिसकिट गुंफा’ म्हणून ती ओळखली जाते. येथील बुद्धाचा सुवर्णपुतळा ३२ मीटर उंच आहे. लेहपासून १२० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. नुब्रा व्हॅलीकडे जातानाच खारदुंगला िखडीची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. ही िखड ५,३५९ मीटर उंचीवर आहे. तेथे जाण्याचा अनुभव अतिशय थरारक असतो. वाहनाने प्रवास करता येण्याजोगा जगातील सर्वात उंचावरचा रस्ता आहे. लेहमध्ये शांती स्तूप आहे. प्राचीन, शाही सौंदर्याचा हा एक आविष्कार आहे. या स्तुपामध्ये बुद्धाचे पुतळे आणि जुनी, दुर्मीळ हस्तलिखिते आहेत.

लेहमधील आणखी पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे शेय मॉनस्ट्री येथे बुद्धाचा धातूचा पुतळा आहे. लडाखमधील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. लेहपासून १५ कि.मी. अंतरावर हे ठिकाण असून लडाखचा राजा डेलडान नामग्याल याने १६५५ मध्ये या मठाची स्थापना केली. उन्हाळ्यामध्ये लडाखचा शाही परिवार येथे वास्तव्य करीत असे. हा मठ पाहण्यासारखा आहे.

लडाखमध्ये बौद्ध मठ आणि बुद्धाचे सुंदर पुतळे पाहायला मिळतात. लडाखच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाची प्रचीती येते. लडाखमध्ये ज्याप्रमाणे दऱ्याखोऱ्याचा प्रदेश आहे त्याचप्रमाणे सपाट प्रदेशही लागतो. तेथे उंटावरची सफारी करता येते. त्याचप्रमाणे जीपमधूनही निसर्ग न्याहाळता येतो. लेह-लडाख गिर्यारोहकांचे नंदनवन आहे. स्थानिक शेर्पाच्या मदतीने गिर्यारोहणाचा आनंद येथे लुटता येतो. लेहच्या रस्त्यांवर सायिक्लग, मोटरबायकिंगची मजा अनुभवता येते. पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि आईसस्केटिंगचा थरारही अनुभवता येतो.

लेह-लडाखचा प्रवास करताना तिबेटी आणि लडाखी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो. धातूच्या शिल्पाकृती, पेटिंग्ज आणि पश्मीना शालींसाठी लडाख प्रसिद्ध आहे. येथे काही सण, उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी  हेमिस आणि लोसार हे उत्सव प्रसिद्ध आहेत. लेहमध्ये पर्यटकांना राहण्याची चांगली सुविधा आहेत. अनेक चांगली हॉटेल्स येथे आहेत. एप्रिल ते मे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर हा कालावधी लेह-लडाख पर्यटनासाठी अनुकूल समजला जातो. लेह येथून जिस्पा केलाँग माग्रे मनालीला जाताना रोहतांग पासही पाहायला मिळते. मनालीहून मग चंदिगडमाग्रे आपला परतीचा प्रवास सुरू होतो. पर्यटनाच्या सुखद आठवणी आयुष्यभर पुरतात. म्हणून आयुष्यात एकदा तरी लेह-लडाख जरूर पाहावे.

केव्हा जाल : जून ते सप्टेंबर हिवाळ्यातला लडाख पाहायचा असेल तर डिसेंबर ते मार्चमध्ये जाता येईल.
कसे जाल : मुंबई-श्रीनगर-लेह किंवा विमानाने मुंबई-लेह
प्रसाद पाटकर – response.lokprabha@expressindia.com