लेखक, कवी, संगीतकार, किंबहुना कुठल्याही सर्जनशील निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला विचारला जाणारा सर्वसामान्य प्रश्न असतो, ‘तुम्हाला सुचतं कसं?’ खरं म्हणजे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं खूपच अवघड आहे. प्रत्येक निर्मितीक्षम माणसाची ‘सुचण्याची’ प्रक्रिया वेगवेगळी असते. श्रीनिवास खळेंना बसच्या किंवा लोकलच्या प्रवासात पहिल्याच फटक्यात अप्रतिम चाली सुचल्याचं आपण ऐकलं आहे. याच्या बरोब्बर उलटं- स्वतचं समाधान होईपर्यंत एकाच गाण्याच्या खळेकाकांनी दहा-दहा चाली केल्याचंदेखील ऐकलं आहे. याचाच अर्थ प्रतिभावान कलाकारांनाही ‘सुचण्या’प्रमाणेच ‘न सुचण्याचा’ अडथळाही आल्याशिवाय राहत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवाती सुरुवातीला मी मला हव्या त्या कवितांना ‘स्वान्त सुखाय’ चाली लावायचो तेव्हा सटासट चाली सुचताहेत याचा अहंकार होता. हाच अहंकार पहिलंवहिलं नाटक करत असताना त्यातल्या गाण्यांना खूप प्रयत्न करूनही चाली सुचत नाहीयेत, हे लक्षात आल्यावर पिकल्या पानासारखा गळून पडला! तासन् तास पेटीसमोर बसूनदेखील ‘आपल्याला काहीच सुचत नाहीये’ याची जाणीव झाल्यावर मला दरदरून घाम फुटत असे. ऑप्शनला टाकलेले सगळे प्रश्न परीक्षेत आले तर जी भीतीची शिरशिरी मणक्यातून जाते, तशीच काहीशी अवस्था नेमून दिलेल्या कामाची वेळ संपत आली आहे, आणि अजून मनात काहीही शिजलेलं नाही, हे उमजल्यावर नसती झाली तरच नवल. गणितात निदान फॉम्र्युले तरी पाठ करता येतात; पण कल्पना सुचण्यासाठी कोणतंही समीकरण नाही.. उत्तर नाही. ‘सुचणं’ कोणी शिकवत नाही.. शिकवूही शकत नाही.

मराठीतील सर्व मैफिलीत माझ्या.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article by rahul ranade
First published on: 25-12-2016 at 01:01 IST