डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

गेल्या रविवारच्या लेखात मी ‘कालाय तस्मै नम:’ म्हटले होते आणि आज ‘स्थानाय तस्मै नम:’ म्हणण्याची वेळ आलीय. याला कारणीभूत ठरली एक चटकदार बातमी. सुनंदन लेलेंना मँचेस्टरच्या अल्ट्रिक्म विभागातील रेस्टॉरंटमध्ये एक जुनीपुराणी, जडसर लोखंडी खुर्ची दिसली. तिच्या पाठीवर ‘बाळू लोखंडे, सावळज’ असा एतद्देशीय मऱ्हाठी मजकूर दिसला आणि लेलेंचा जीव अभिमान, कुतूहल आणि औत्सुक्याने भरून आला. सुनंदनना भारतीय इतिहास संशोधन आणि पुराणवस्तू विभागाने विशेष पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित गौरव करावा अशी आम्ही ‘मा बदौलत सरकारासी’ दरख्वास्त करीत आहोत.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड

सांगलीचं आमचं तासगाव द्राक्षांसाठी, सुंदर गुलाबांसाठी आणि आमचे लाडके लोकनेते आबा अर्थात आर. आर. पाटील यांच्यासाठी प्रसिद्ध. तासगावपासून १८ कि. मी.वर सावळज. शनिवारचा बाजार म्हणजे कोण गर्दी! हळद, द्राक्षे, मनुका, फळे, भाजीपाला यांचे रोखीचे व्यवहार झाले की मंडळी भजी, मिसळपाव किंवा कटिंग कडकसाठी टेकतात, तीच ही लोखंडी खुर्ची. त्यात बाळू लोखंडे हे मंडप कॉन्ट्रॅक्टर. पंधरा वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या एकावर एक बसणाऱ्या खुच्र्या घेतल्यावर लोखंडे यांनी तेरा किलोची ही खुर्ची भंगारात काढली. ती मुंबईमार्गे थेट साहेबाच्या देशात पोहोचली! साहेबाने घाऊक लोखंड लिलावात ती घेतली, की जुन्या सवयीनुसार तशीच उचलली, हे साहेबासच ठाऊक. ‘ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड’ ही म्हण आम्ही साहेबाकडूनच शिकलो. आणि उगाच बोलत नाय.. दहा गोष्टी तरी आमच्या कानावर आहेतच. आमच्या छत्रपतींची भवानी तलवार, कोहिनूर हिरा, शहाजहानचा वाईन ग्लास, टिपूची अस्त्रे, टिपूचा लाकडी वाघ, टिपूची अंगठी, सुलतानगंजचा बुद्धपुतळा, अमरावतीची कोरीव शिल्पे आणि रणजितसिंहाचे सिंहासन. आता हे चौर्यकर्म आहे की अँटिक्स जमवून सांभाळण्याचा कलाविष्कार आहे, या वादात आम्हांस पडण्याचे कारण नाही.

मुळात बाळू लोखंडेंची खुर्ची ‘अँटिक्स’मध्ये मोडत नाही. अँटिक्स साधारण शंभर वर्षे जुनी, अप्रतिम कलाकुसर, दुर्मीळ प्रकटीकरण असलेली अशी एकमेवाद्वितीय असतात. बाळू लोखंडेंच्या दृष्टीने ती ‘भंगार’ होती आणि सावळज ते मँचेस्टर हा प्रवास आणि आता तिला प्राप्त झालेले ऐतिहासिक महत्त्व हा सारा स्थित्यंतराचा आणि स्थानाचा महिमा म्हणायला हवा. देवनागरी लिपीचे आकर्षण हाही तिच्या जतन आणि पुनर्वापरातील महत्त्वाचा भाग असू शकेल. आजवर मंत्री खुर्ची सांभाळतात हे माहीत होते, पण इथे तर इंग्रजाने माझ्या एका ग्रामीण बंधूची ठेव जपली होती.

आयुष्यात योग्य वेळी, योग्य ठिकाणी असणे महत्त्वाचे. एखादी विशेष गोष्ट नावारूपाला येते ती तो विशिष्ट काळ, वेळ किंवा स्थळामुळे. मग एखादा रंग उडालेला आरसा पेशवेकालीन वारसा होतो आणि १९५०च्या दशकातील तोंडाला हँडल मारल्यावर सुरू होणारी डुक्कर फियाट ‘व्हिंटेज क्लासिक’ होते. एखादी गोष्ट कालपरत्वे कालबा होते, पण उपयोगमूल्यदृष्टय़ा शून्य होत नाही. दर्शनीय न वाटणाऱ्या गोष्टी प्रदर्शनीय ठरतात आणि तद्दन टाकाऊ म्हणून ग्रा मानलेल्या बाबींना संग्रातेचा मान मिळतो. गोष्ट कोणती आहे, कशी आहे यापेक्षा ती कुठे आहे, यावर तिचे मूल्य अधोरेखित होते. खाकी रंगाचे पट्टा तुटलेले मॉडर्न हायस्कूलमधले माझे दप्तर मी दहा वेळा घर आवरताना काढतो; पण फेकायला हात धजावत नाही, हेच खरे!

बाळू लोखंडय़ांच्या त्या खुर्चीने माझी कॉलर उगीचच ताठ झाली. पुढच्या महिन्यात सांगलीला जाईन तेव्हा लोखंडय़ांकडे १५-२० वर्षांपूर्वीचे अजून काय काय नग शिल्लक आहेत याचा शोध घेईन म्हणतो.

..आणि हो, गेले १५ महिने खूप ‘वर्क फ्रॉम होम’ केल्यामुळे माझी एक घरातली जुनी खुर्ची मोडकळीस आली आहे. तिची गणना भंगारात होण्यापूर्वी तिच्या पाठीवर ‘संजय ओक, मुलुंड’ असा मजकूर टाकून घेतो..

बाकी स्थानाय तस्मै नम:।