मंगल कातकर

आयुष्य जगत असताना माणसाला बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या सर्व प्रकारच्या घटना संवेदनशील मन टिपत असतं. हे अनुभवसंचित घेऊन त्याला कल्पनेची जोड देत लेखक लेखन करीत असतो. असंच समाजातील कडू-गोड वास्तवाचं टिपलेलं अनुभवविश्व वाचायला मिळतं मॅटिल्डा डिसिल्वा यांच्या ‘निवांत’ या कथासंग्रहात. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह आहे.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत. सगळय़ाच कथा कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेशी निगडित आहेत. त्यामुळे त्या आपल्या आसपास घडणाऱ्या वाटतात. २१व्या शतकात जगतानाही स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. घराबाहेरच नाही तर काही घराच्या आतही स्त्रिया सुरक्षित नाहीत. ज्याने रक्षण करायचं तो बापच जेव्हा आपल्या मुलीचं शारीरिक शोषण करतो, तेव्हा ते घर त्या मुलीसाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठिकाण होतं. हे वास्तव दाखविणारी ‘चावरं कुंपण’ ही कथा समाजातल्या पुरुषी वासनेची विदारकता दाखवते.

घराण्याचा वंश पुढे चालू राहावा म्हणून आजही लोक लग्न संस्थेकडे पाहतात. एखादी मुलगी अपत्य देण्यास सक्षम नसल्याचं कळल्यावर तिचं ठरलेलं लग्न मोडू शकतं. अशा वेळी मुलाने अपत्यापेक्षा आपल्या सहचर मुलीच्या प्रेमाचा विचार करणं आवश्यक असतं. हल्ली समाजात असे सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. हेच ‘मनोमिलन’ कथेतून लेखिकेने सांगितलं आहे.

भिन्नमती मुलांचं संगोपन करताना त्यांच्या पालकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातलीच एक समस्या मुलगा वयात येण्याची. ही समस्या सोडवताना एकल पालकत्व असणाऱ्या आईला किती यातना होतात हे ‘मोकळा’ या कथेत वाचून आपले डोळे पाणावतात.‘ विरार लोकल’ ही हलकी-फुलकी अव्यक्त प्रेमकथा आहे, तर ‘सागरसखा’ ही प्रेमासाठी केलेल्या त्यागाची कथा आहे. ‘प्रेमाच्या वाटेवरील वेदना’ ही कथा आजच्या तरुण मुलींना विचार करायला भाग पाडते. समाजातल्या माणसाचं वास्तव जगणं दाखविणाऱ्या ‘निवांत’ या कथासंग्रहातल्या कथा बदलत जाणारा समाज समजण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत.

‘निवांत’, – मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा, ग्रंथाली प्रकाशन, पाने- ११३, किंमत- २०० रुपये.